Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या घरात रडारडी; घरच्यांना फोन लावताच अश्रूंचा बांध फुटला

Bigg Boss Marathi New Season Day 20 : बिग बॉसच्या घरामध्ये अश्रूंचा पाऊस पहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य त्यांच्या घरच्याशी बोलताना भावनिक होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यातचं सर्व सदस्यांची आक्रमक भूमिका पहायला मिळत्ये. कोणत्या ना कोणत्या कारणांवरून भांडण आणि राडे सुरुच असतात. कालच्या भागामध्ये बिग बॉसने सर्व सदस्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर कॅप्टनसी टास्कला सुरुवात झाली आहे. या टास्क दरम्यान कॅप्टन पदाच्या उमेदवारांना गार्डन एरियामध्ये ठेवलेलया फ्रेंच फ्राइजना टास्कमधील सदस्यांना वाचनायचे आहेत. टास्कच्या अंतिम टप्पायत ज्या सदस्याकडे जास्त फ्राइज वाचतील तो सदस्य यंदाच्या आठवड्याचा कॅप्टन ठरेल.

बिग बॉस मराठी'च्या घरात आज अश्रूंचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य त्यांच्या घरच्यांशी संवाद साधणार आहेत. मागील ३ आठवड्यांपासून सर्व सदस्य त्यांच्या घरच्यां पासून दूर राहात आहेत. अशा परिस्थितीमध्ये बिग बॉसने सदस्यांचा त्यांच्या घरच्यांसोबत संवाद करून दिलाय.

बिग बॉस मराठीमधील सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेलं पाहायला मळणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये नेहमी धुमाकुळ घालणारे सदस्य फोनवर घरच्यांशी बोलताना भावनिक झाल्याचे चित्र दिसत आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कधी कोणाचा शत्रू हे सांगणं खूप कठिण आहे. मात्र घरच्याशी दूर राहून सर्व सदस्यांना त्याच्या घराची ओध लागल्याचे दिसत आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आलाय. नव्या प्रोमोमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळतोय. बिग बॉसमराठीच्या घरातून घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडताना दिसून येत आहेत. प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"घरातील सर्व सदस्यांनी त्याच्या जीवलंगासोबत आपुलकीचा संवाद". नेहमी एकमेकांसोबत भिडणारे सदस्य आजच्या भागात आपल्या त्यांच्या भावना सदस्यांपुढे व्यक्त करताना दिसणार आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT