Shehnaaz Gil Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

'बिग बॉस' फेम अभिनेत्री चर्चेत; या अभिनेत्याचा व्हिडिओ केला शेअर

बिग बॉस सीझन १३ फेम शहनाज गिल येत्या काही दिवसांमध्ये चर्चेत आहे. ती लवकरच सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) आगामी चित्रपट 'कभी ईद कभी दिवाली' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शहनाज गिल सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी ती खूप उत्सुक आहे. आगामी काळात शहनाज गिल अभिनेता हृतिक रोशनसोबत(Hrithik Roshan) मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहनाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनेता हृतिकचा एक व्हिडिओ शेअर केल्यापासून चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडिओसोबत तिने एक उत्तम कॅप्शनही लिहिली. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

अलीकडेच हृतिक रोशन एका जाहिरातीमध्ये बियर्ड लूकमध्ये दिसला होता. हा व्हिडिओ स्वतः हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो कॅज्युअल आउटफिटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. त्याने आपल्या लूकने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याच्या या लूकने शहनाजलाही भुरळ पडली. तिने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर शेअर केला आहे.

शहनाज गिलने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये हृतिक रोशनची पोस्ट शेअर केली असून, आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासाठी तिने, 'वाइब तेरी मेरी मिल दिया' हे दिलजीत दोसांजने गायलेले प्रसिद्ध गाणं "वाइब" च्या ओळी कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत. शहनाजचे हे कॅप्शन पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली. या जाहिरातीत एकतर शहनाज हृतिकसोबत आहे किंवा दोघेही लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत, असे चाहते म्हणू लागले आहेत.

'बिग बॉस १३' मधून चर्चेत

जेव्हा शहनाज गिल २०१९ साली 'बिग बॉस १३' मध्ये आली, तेव्हा तिने स्वतःची ओळख 'पंजाबची कतरिना कैफ' अशी करून दिली होती. शोनंतर शहनाजची जबरदस्त फॅन फॉलोइंग वाढली होती आणि ती सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. आजच्या घडीला शहनाज लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अलख निरंजन! डार्क वेबवर कोड वापरून ड्रग्सची तस्करी करणारी टोळी, पुणे पोलिसांनी उघडकीस आणलं आंतरराष्ट्रीय नेक्सस

Heart Attack Risk: डायबेटीज, बीपी आणि इन्फेक्शनमुळं वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्या?

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का? शिक्षा झाल्यास मंत्रीपद अन् आमदारकीचं काय होणार?

Krantijyoti Vidyalaya: 'मजा,मस्ती, धमाल… आणि आठवणींचे रियुनियन! 'क्रांतिज्योती विद्यालय–मराठी माध्यम'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Gadchiroli News : गडचिरोलीच्या श्वेताचा दुबईत डंका; आशियाई पॅरा गेम्समध्ये केला ऐतिहासिक पराक्रम

SCROLL FOR NEXT