Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीला मिळाली नवी जोडी, भूषण–केतकीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री ‘तू माझा किनारा’ मध्ये दिसणार

Tu Majha Kinara Marathi Movie: भूषण प्रधान आणि केतकी नारायण यांची नवी जोडी ‘तू माझा किनारा’ चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर झळकणार आहे. हा सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून भावनिक प्रवास दाखवणार आहे.

Manasvi Choudhary

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगळ्या कथा प्रेक्षकांसमोर आणणारे चित्रपट आले आहेत. त्या परंपरेत आता आणखी एक नाव जोडले जाणार आहे. ‘तू माझा किनारा’. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलेले भूषण प्रधान आणि तेलुगू, मल्याळम, हिंदी तसेच मराठी चित्रपटांमधून बहुआयामी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी केतकी नारायण आता प्रथमच एकत्र झळकणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या दोघांचा एकत्र फोटोशूट प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळं प्रेक्षकांमध्ये कुतूहल आणि थोडा गोंधळ निर्माण झाला होता. अनेकांना ते दोघं खऱ्या आयुष्यात एकत्र असल्याचं वाटलं. मात्र आता ‘तू माझा किनारा’च्या पोस्टर रिलीजमुळे या रहस्याचा उलगडा झाला आहे. तो फोटोशूट प्रत्यक्षात या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता.

घरत गणपती, ऊन सावली, लग्न कल्लोळ, जुनं फर्निचर यांसारख्या चित्रपटांतून भूषण प्रधानने आपली वेगळी छाप सोडलेली आहे. तर केतकीने युथ, उदाहरनार्थ नेमाडे असे मराठी चित्रपट, अंडरवर्ल्ड आणि विचित्रम असे मल्याळम चित्रपट, फादर चिट्टी उमा कार्तिक तेलुगू चित्रपट आणि 83 सारखा हिंदी चित्रपट गाजवला आहे. तसेच तिने अनेक म्युझिक व्हिडिओ, शॉर्ट फिल्म्स आणि वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

चित्रपटाचं कथानक नेमकं काय आहे, हे अजून गूढच ठेवण्यात आलं आहे. पण इतकं नक्की हा सिनेमा प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करणारा असून, साध्या वाटणाऱ्या आयुष्यातले असाधारण प्रश्न समोर आणणार आहे. ‘तू माझा किनारा’ फक्त पडद्यावर घडणारी कथा नाही, तर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात कुठेतरी उमटणारा आरसा आहे.

भूषण आणि केतकीची ही अनोखी जोडी नक्की कोणत्या रूपात दिसणार? त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये कोणते संघर्ष, कोणते शोध लपले आहेत? या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘तू माझा किनारा’ मध्ये. हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव देईल, एवढं मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rudrayani Fort News : संसाराची तूच जननी...! श्रीरामाने 'या' देवीचं दर्शन दोनदा घेतलं, काय आहे आख्यायिका? जाणून घ्या

Vande Bharat Sleeper Trains : दिवाळीत मिळणार गुडन्यूज! वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट

Horrific Accident : पोलीस अधिकाऱ्याच्या कारने चिरडून एकाचा मृत्यू; मध्यरात्री घडला अपघाताचा थरार

Beed Flood: बीडमध्ये पावसाचं रौद्ररूप, सिंदफणा नदीला महापूर; शेती- गावं पाण्याखाली, पाहा ड्रोन VIDEO

Sambhajinagar Rain : अनेक वर्षांतील पावसाचे विक्रम मोडीत; संभाजीनगरात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT