Gharat Ganpati In Bhushan Pradhan And Nikita Dutta saam tv
मनोरंजन बातम्या

Gharat Ganpati : ‘घरत गणपती’ चित्रपटात भूषण निकिताची जोडी जमली

Gharat Ganpati In Bhushan Pradhan And Nikita Dutta : चित्रपटामध्ये कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून नव्या जोडीची चर्चा होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपेरी पडद्यावर सध्या अनेक वेगवेगळ्या चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या २६ जुलैला ‘घरत गणपती’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटामध्ये कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून नव्या जोडीची चर्चा होताना दिसत आहे.

भूषण प्रधान आणि निकिता दत्ता ही नवी जोडी ‘घरत गणपती’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओच्या बॅनर खाली तयार झालेला ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

भूषण प्रधान आणि निकिता दत्तासोबत अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन 'घरत गणपती' हा चित्रपट येत्या २६ जुलैला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT