Bhoot Police | हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली फिल्म १७ सप्टेंबरला रिलीज होणार Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Bhoot Police | हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली फिल्म १७ सप्टेंबरला रिलीज होणार

हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली भूत पोलिस (Bhoot police) ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होत असून या सिमेनाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बहुप्रतिक्षित आणि मल्टास्टारर फिल्म भूत पोलिस (Bhoot Police) येत्या १७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम अशा मल्टी स्टारसह ही फिल्म रिलीज होत आहे. हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होत असून या सिमेनाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे. (Bhoot Police | The horror and comedy film will be released on September 17)

पहा व्हिडिओ -

भूत पोलिस या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर पाहून लक्षात येते की ही फिल्म हॉररसह प्रेक्षकांना खळखळूम हसवणारी देखील असणार आहे. यात सैफ, अर्जुन, जॅकलीन आणि यामी हे चोघेजण भुतांना पकडण्याचं काम करतात, त्यामुळे या सिनेमाचं नाव भुत पोलिस असावं. यातील कलाकारांनी सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर आपल्या इंस्टाग्राम पेजवरुन शेयर केले आहे. ज्यात त्यांनी लिहीलं की, ''आता घाबरण्याची वेळ भूतांची आहे.'' त्यामुळे या हॉरर प्लस कॉमेडी फिल्मची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

पहा ट्रेलर -

खरंतर ही फिल्म थिएटर्समध्येच रिलीज करण्यात येणार होती, मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे ही फिल्म आता ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात सध्या थिएटर्स सुरु नसले तरी घरबसल्या तुम्हाला या फिल्मचा आनंद घेता येणार आहे.

या मुव्हीमध्ये सैफ अली खानचं नाव विभूति, अर्जुन कपूरचं नाव चिरौंजी असणार आहे. तर यामी गौतमचं नाव माया आणि जैकलीन फर्नांडिसचं नाव कनिका असेल. वर्क फ्रॉम होममुळे किंवा कामाच्या तणावामुळे तुम्ही बोर झाला असाल तर काहीसं मनोरंजन म्हणून ही फिल्म तुम्ही नक्कीच बघू शकता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Holi Party 2026 : सँडविच ढोकळा कधी खाल्ला आहात का? होळीला करा कलरफुल नाश्ता, पेटपूजा होईल बेस्ट

Thandai Recipe: रंगपंचमीला सकाळी बनवा टेस्टी थंडाई; वाचा सोपी रेसिपी

Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धादरम्यान दुबई विमानतळावर अडकली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

Maharashtra Live News Update: नागपूरच्या SBL कंपनीत भीषण स्फोट; १५ जण जखमी

SCROLL FOR NEXT