Bhool Chuk Maaf Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhool Chuk Maaf: 'आज 29 है या 30?'; टाईम लूपमध्ये अडकली राजकुमार राव आणि वामिका गब्बीची अजब लव्हस्टोरी

Bhool Chuk Maaf Trailer: राजकुमार रावचा 'भूल चुक माफ' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. सरकारी नोकरी आणि वेळेच्या चक्रात अडकलेल्या त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे.

Shruti Vilas Kadam

Bhool Chuk Maaf: राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या आगामी रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'भूल चूक माफ' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एक वेगळीच प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. करण शर्मा दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स निर्मित हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे .​

चित्रपटाची कथा वाराणसीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, जिथे रंजन (राजकुमार राव) आणि तितली (वामिका गब्बी) यांच्या लग्नाच्या तयारीदरम्यान एक विचित्र टाइम लूप सुरू होतो. 29 तारखेला हल्दी समारंभ पार पडतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच तारीख आणि तीच हल्दीची तयारी दिसते. रंजनला समजते की तो वेळेच्या चक्रात अडकला आहे, जिथे प्रत्येक दिवस पुन्हा 29 तारखेच असतो.​

टीझरमध्ये विनोद आणि रोमँटिक ड्रामाचा सुरेख संगम दिसतो. राजकुमार रावचा 'आज 29 आहे की 30?' असा संवाद प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतो. चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्यासोबत सीमा पाहवा, रघुबीर यादव आणि जाकिर हुसैन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'भूल चूक माफ' हा चित्रपट सनी देओलच्या 'जाट' या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांना दोन्ही चित्रपटांची उत्सुकता आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

भूल चुक माफच्या ट्रेलरवर सोशल मीडिया नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने लिहिले, 'भावाने संपूर्ण चित्रपट दाखवला.' दुसऱ्याने कमेंट केली, 'चित्रपटाचा ट्रेलर मजेदार आहे आणि तो पाहिल्यानंतर मजा आली.' एका युजरने तर लिहिले की 'माझ्या लग्नाच्या एक दिवसानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.' याशिवाय, बहुतेक युजरने कमेंट सेक्शनमध्ये अभिनेता राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT