Bhool Bhulaiyaa 2 Instagram/@kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Bhool Bhulaiyaa 2 Trailer: मंजुलिकाच्या एन्ट्रीनं उडवला काळजाचा थरकाप!

कार्तिक आर्यनचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'भूल भुलैया 2' चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि हॉररने भरलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कार्तिक आर्यनचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'भूल भुलैया 2' चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि हॉररने भरलेला आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या भूल भुलैयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्या चित्रपटातली विद्या बालनची भूमिका प्रचंड गाजली होती. यावेळेसच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसत आहेत. भूषण कुमार आणि मुराद खेतानी निर्मित हा हटके कॉमेडी चित्रपट 20 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे. हॉरर आणि कॉमेडीचा उत्तम टेम्पर ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असून चित्रपटाचा ट्रेलर लोकांना हसवत आहे. परंतु, चित्रपटातील मंजुलीकाची दमदार एंट्री थरकाप उडवणारी आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात आमी जेतो मा... या प्रसिद्ध गाण्याने होते, त्यानंतर तब्बूचा काहीतरी सांगताना आवाज ऐकू येतो. कार्तिक आर्यनची एंट्री होते. तो या चित्रपटात रूह बाबाच्या भूमिकेत दिसत आहे, जो आत्मा पाहत असतो पण इतकेच नाही तर कधी कधी त्याच्या आत आत्मा देखील येतात. ट्रेलरमधील कियारा अडवाणीचा अभिनयही दमदार दिसून येत आहे. या चित्रपटात राजपाल यादव आणि संजय मिश्रा सारखे प्रतिभावान कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कार्तिक आणि कियारा रोमान्स करताना दिसून येतात. पण मंजुलिकाच्या एन्ट्रीनंतर सगळा गेम उलटून जातो!

विशेष म्हणजे, हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या भूल भुलैया या चित्रपटाचा सिक्वेल आहे. भूल भुलैयामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, अमिषा पटेल, शायनी आहुजा, परेश रावल, मजोज जोशी, राजपाल यादव मुख्य भूमिकेत होते. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांच्या टी-सीरीजच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. 'भूल भुलैया' पेक्षा हा चित्रपट पूर्णपणे वेगळा आणि नवीन आहे असे, असे बोलले जात आहे.

पाहा ट्रेलर-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: सरकारी नोकर भरतीचे नियम मधेच बदलता येणार नाहीत; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Maharashtra News Live Updates: पुण्याचे आबा बागुल, व्यवहारे, आनंद ६ वर्षांसाठी निलंबित, काँग्रेसची धडक कारवाई

Success Story: एका ड्रिंकनं डोकं झणाणलं; देसी ड्रिंकला ब्रँड बनवून ३ भाऊ झाले कोट्यवधींच्या कंपनीचे मालक

कांदा कापताना डोळ्यांतून पाणी का येते?

Shweta Tiwari: सौंदर्य अन् वय पाहून म्हणाल; ही तर विशीतली पोर

SCROLL FOR NEXT