चीनमध्ये लोकांचा आक्रोश! 1 महिन्यापासून लॉकडाऊन, ना घरात अन्न ना दुकानात सामान!

कोरोनाने पुन्हा एकदा हात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील शांघाय ते बीजिंगपर्यंत कोविडच्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे.
China Lockdown
China LockdownSaam Tv
Published On

कोरोनाने पुन्हा एकदा हात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील शांघाय ते बीजिंगपर्यंत कोविडच्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. चीनच्या या दोन शहरांसोबतच इतर भागातही करोडो लोकांची सामूहिक चाचणी (Mass Testing) केली जाणार आहे. कोरोना संकटामुळे शांघाय (Shanghai) चार आठवड्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे आणि त्याची भीती आता बीजिंगच्या (Beijing) लोकांना सतावत आहे.

चीनमध्ये सोमवारपासून सामूहिक चाचणी करणे सुरू झाले आहे. सामूहिक चाचणीच्या एकूण तीन फेऱ्या होणार आहेत. बीजिंग शहरात पहिल्या फेरीत सुमारे 35 लाख लोकांची मास टेस्टिंग करण्यात आली.

China Lockdown
करीना-सैफची मुलांसह पूल पार्टी! पाहा Photos

शांघायबद्दल सांगायचे झाले तर, तेथील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. लॉकडाऊन होऊन 4 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या 24 तासांत तेथे 19 हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 51 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. शांघायमध्ये 25 दशलक्षाहून अधिक लोक राहतात, आता त्यांची मास टेस्टिंग सुरू झाली आहे.

लॉकडाऊनमुळे घरात बंद असलेल्या लोकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तिथे वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. कुरिअर कंपन्यांची डिलिव्हरी बंद आहेत. सुपरमार्केटमधून भाजीपाला, तांदूळ, तेल, नुडल्स आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू तर जणू गायबच झाल्या आहेत. तर दुसरीकडे, ऑनलाइन खाद्यपदार्थांची दुकाने सामान नसल्यामुळे डिलिव्हरी करत नाहीत.

हे देखील पहा-

शांघायनंतर बीजिंगमध्येही कोरोनाने कहर केला आहे. तेथे सोमवारी 1661 नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बीजिंगमध्ये राहणाऱ्या बहुतांश लोकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे, त्यामुळे लोक घाबरले आहेत.

बीजिंगची एकूण लोकसंख्या 20 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. कोरोना चाचणीबाबत कारवाई सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे त्यांनी घाबरून वस्तू खरेदी करण्यास सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. तेथील लोकांना भीती आहे की, शांघायसारखे कडक लॉकडाऊन त्यांच्या भागात लागू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com