Bholaa Tabbu 1st Poster
Bholaa Tabbu 1st Poster Instagram/ @ajaydevgn
मनोरंजन बातम्या

Bholaa Motion Poster: तब्बूच्या 'भोला'मधील लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष, दिसणार डॅशिंग अवतारात...

Chetan Bodke

Bholaa Motion Poster: 'दृश्यम 2' या चित्रपटातून अजयने दमदार अभिनय करत बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. लवकरच अजय देवगण आगामी 'भोला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर 22 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. हातात श्रीमद्भगवद्गीता आणि कपाळावर राख लावलेल्या अजय देवगणचा हा लूक चाहत्यांना फारच भावला होता. आता नुकताच 'भोला' चित्रपटातील तब्बूचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला आहे.

'भोला' चित्रपटातील तब्बूच्या लूकचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले आहे, ज्यामध्ये तब्बूच्या डोळ्यांवर गॉगल आणि हातात बंदूक घेऊन अतिशय इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. तब्बूचे पोस्टर शेअर करत अजयने लिहिले, 'एक खाकी-सौ शैतान'. अजयचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतरच हे पोस्टर सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आले आहेत.

'दृश्यम' नंतर अजय आणि तब्बू पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या मोशन पोस्टरमध्ये तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या पोस्टरमध्ये चाहते तब्बूच्या लूकचे खूपच कौतुक करत आहेत. तब्बूचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

'भोला' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे, यामध्ये अजय देवगण अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता अजय देवगण आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचे आणखी काही मोशन पोस्टर समोर आले आहेत, ज्यामध्ये अजय देवगणनंतर तब्बूचा पोलीस ऑफिसर लूक पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT