Akanksha Dubey Big Update Instagram @akankshadubey_official
मनोरंजन बातम्या

Akanksha Dubey Death News: आकांक्षा दुबे मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; भोजपुरी गायकाला अटक

Bhojpuri Singer Arrested In Akanksha Dubey Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे 26 मार्च रोजी सारनाथ भागातील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली होती.

Pooja Dange

Update on Akanksha Dubey's Death Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला गायक समर सिंग याला वाराणसी आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने गाझियाबाद येथून अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर वाराणसीला नेण्याची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील दुसरा आरोपी संजय सिंग याचा शोध सुरू आहे.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या गायक समर सिंह आणि संजय सिंह यांच्याविरोधात न्यायालयाने गुरुवारी अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले.

दोन्ही आरोपींविरुद्ध अटक वॉरंट मिळावे, यासाठी आयुक्तालयाच्या पोलिसांच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. ज्यामध्ये आरोपी गायक समर सिंह याला अटक करण्यात आली आहे, तर पोलीस दुसरा आरोपी संजय सिंहचा शोध घेत आहेत.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे 26 मार्च रोजी सारनाथ भागातील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली होती. 27 मार्च रोजी आकांक्षा दुबे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्याविरुद्ध सारनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आकांक्षा दुबे ही भडोहीच्या चौरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारसीपूर येथील रहिवासी होती. या प्रकरणी आकांक्षा दुबेच्या कुटुंबीयांच्या वकिलाने वाराणसी पोलिसांना पोस्टमॉर्टमबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत.

पोलिसांनी दावा केला होता की आकांक्षा दुबे मृत्यूपूर्वी दारू प्यायली होती, तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेखही नव्हता. अहवालात आकांक्षाच्या पोटात तपकिरी रंगाचे रसायन आढळले आहे.

वकिलाने सांगितले की, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आकांक्षाच्या हातावर झालेल्या दुखापतीचा उल्लेख आहे, तर पोलिसांनी त्यांच्या अहवालात त्याचा उल्लेखही केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठं यश; 'लश्कर'च्या कमांडरला यूसमर्गच्या एन्काउंटरमध्ये टिपलं

मुंबईहून 40 पर्यटकांचा ग्रुप नाशिकमध्ये आला, रामकुंडात स्नान करताना 5 जण बुडाले

Maharashtra News Live Update: नागपुरातील इटाभट्टी परिसरात LPG वाहून नेणाऱ्या ट्रकमधून गॅसची गळती

Face Care: रोज मेकअप करता? मग चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरा हा घरगुती क्लींजर, स्किन दिसेल नेहमी ग्लोइंग

EPFO Alert: नोकरी सोडली तरी PF वर मिळणार व्याज? EPFO चा हा नियम नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT