Bhojpuri Celebrity Death In Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

२३ वर्षीय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू, ४ नवोदित कलाकारांसह ९ जणांनी गमावला जीव

Aanchal Tiwari Death In Road Accident: या अपघातात आंचल तिवारीसह भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील ४ नवोदित कलाकारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

Priya More

Bhojpuri Film Industry:

भोजपुरी मनोरंजनसृष्टीतून (Bhojpuri Film Industry) एक दु:खद बातमी समोर येत आहे. भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारीचा (Aanchal Tiwari) भीषण रस्ते अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातामध्ये आंचल तिवारीसह भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील ४ नवोदित कलाकारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अपघाताची ही घटना रविवारी बिहारच्या कैमूर जिल्ह्यामध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या कैमूर येथे रविवारी भीषण रस्ते अपघात झाला. एसयूव्ही कार आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये अभिनेत्री आंचल तिवारी, भोजपुरी गायक छोटू पांडे, अभिनेत्री सिमरन श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीतील चार नवोदित कलाकारांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे या कलाकारांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून सोशल मीडियावर पोस्ट करत अनेक जण दु:ख व्यक्त करत आहेत. बिहारमधील कैमूरमधील देवकाली गावात जीटी रोडवारजवळ रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. सोमवारी सकाळी मृताची ओळख पटली. मृतांमध्ये आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंह, अनु पांडे, शशि पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे यांचा समावेश आहे.

दोन महिलांसह ८ जण एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. या कारने आधी एका मोटरसायकलला धडक दिली. त्यानंतर कार आणि मोटरसायकल दुसऱ्या मार्गिकेवर गेल्या. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. या घटनेमध्ये मोटरसायकल चालकासह ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. बिहार पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT