Kajal Raghwani car attacked by crowd in Nalanda Bihar saam tv
मनोरंजन बातम्या

मोठी बातमी! अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला; जमावाने फोडल्या कारच्या काचा

Kajal Raghwani Car Attack: नालंदा येथे भोजपुरी कलाकार काजल राघवानी यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या एका शोरूमच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या, परंतु त्यांना पाहण्याच्या ओढीपोटी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या गाडीची खिडकी फोडली.

Bharat Jadhav

  • नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथे काजल राघवानी यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला.

  • शोरूम उद्घाटनासाठी अभिनेत्री आल्या असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

  • गोंधळादरम्यान फॉर्च्युनरच्या खिडकीची काच फुटल्याचे वृत्त

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीच्या गाडीवर हल्ला झालाय. हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री काजल एका शोरूमच्या उद्घाटनासाठी बिहार शरीफ येथे आली होती. या अभिनेत्रीची झलक पाहण्यासाठी जमलेला जमाव अनियंत्रित झाला. या गोंधळादरम्यान, जमावाने तिच्या गाडीवर हल्ला केला. लोकांनी तिच्या 'फॉर्च्युनर' कारच्या खिडकीची काच फोडली.

गाडीवर विटांनी हल्ला

घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असूनही काजल राघवानी यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या एका अनियंत्रित जमावाने गाडीवर हात आणि विटांनी हल्ला केला. ज्यामुळे गाडीची खिडकी फुटली. मात्र, शोरूम व्यवस्थापकाच्या प्रसंगावधानामुळे काजल राघवानी यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढण्यात यश आले; त्या बाहेर येताच चालकाने गाडी वेगाने त्या भागातून बाहेर नेली.

गर्दी नियंत्रणाबाहेर गेली

काजल राघवानी यांच्यासोबत असलेल्या बाउन्सरनी सांगितले की, पाटण्याहून १२-१३ बाउन्सर आलेले असूनही गर्दी प्रचंड होती. त्यामुळे अभिनेत्रीला सुरक्षा कडे तयार करून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आणखी एका बाउन्सरने गर्दीच्या प्रचंड प्रमाणाचा उल्लेख करत सांगितले की, मागील दरवाजातून त्यांना बाहेर काढताना खूप कसरत करावी लागली, कारण बाहेर त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT