TDM Trailer Out Instagram @tdm.marathi.movie
मनोरंजन बातम्या

Marathi Movie TDM Trailer: आयुष्याची वाट लागली की मुंबई पुण्याची आठवण येते' दणक्यात आलाय TDM चा ट्रेलर

Marathi Movie TDM: टीडीएम चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

Pooja Dange

Marathi Movie TDM Trailer Out: महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे चित्रण करणे चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे घेऊन येत असतात. ख्वाडा आणि बबननंतर दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा टीडीएम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

टीडीएम चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शित होताच चित्रपटाचा व्हायरल देखील झाला आहे. टीडीएम चित्रपटही गाणी प्रेक्षकांना आवडली होती. त्यांनतर प्रेक्षक चित्रपट कथा जाणून घेण्यास उत्सुक होते. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची आतुरता आणखी वाटली आहे.

अॅक्शन आणि रोमान्सने या चित्रपट परिपूर्ण आहे. टीडीएम चित्रपटामध्ये ग्रामीण प्रश्न आणि प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. 'ख्वाडा', 'बबन' यांच्या यशस्वी निर्मितीनंतर दिग्दर्शक भाऊराव कराडे यांचा 'टीडीएम' हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

टीडीएम चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच विहीर खाणण्यापासून होते. त्यामुळे पाणी या प्रश्नावर चित्रपट आधारित असल्याचे दिसून येते. त्यानंतर चित्रपटामध्ये अनेक सामाजिक विषय दाखविण्यात आले आहेत. यासगळ्यात मुख्य कलाकारांचे फुलत जाणारे प्रेम देखील तुमचे लक्ष वेधून घेते. नायकाला गावात व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी त्याची चाललेली धडपड आणि या मार्गात येणार अडथळे तो कसा पार करतो हे चित्रपटमध्येच पाहायला मिळेल.

टीडीएममधील अनेक कलाकार नवखे आहेत. परंतु कलाकारांच्या अभिनयातून त्यांचा नवखेपणा अजिबात जाणवत नाही. खेड्यापाड्यातील नायकाचा हजरजबाबीपणा, त्याची चालण्या बोलण्याची पद्धत या सर्वाशी तुम्ही कनेक्ट व्हाल. ट्रेलरमधील डायलॉग देखील दमदार आहेत. ट्रेलरमध्ये दिग्दर्शक भाऊरावांची देखील एन्ट्री पाहायला मिळतेय. ट्रेलरमधील 'लाथ मारशील तिकडे पाणी काढशील' हा डायलॉग लक्षवेधी ठरत आहे. .

'ख्वाडा', 'बबन' चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर भाऊराव कऱ्हाडे एक नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. या चित्रपटाच्या संवाद, पटकथा आणि कथेची जबाबदारी भिकू देवकाते, भाऊराव कऱ्हाडे, प्रो. किरण गाढवे यांनी सांभाळली आहे.

तर संगीताची बाजू रोहित नागभिडे, ओंकारस्वरूप बागडे, वैभव शिरोळे यांनी पेलवली आहे. तर गायक नंदेश उमप, ओंकारस्वरूप, वैभव शिरोळे, प्रियंका बर्वे, आनंदी जोशी बोललग चित्रपटातील गाणी गायली आहेत.

चित्रपटाची सिनेमेटोग्राफी वीरधवल पाटील यांनी केली आहे. २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT