Bharti Singh Video saam tv
मनोरंजन बातम्या

Bharti Singh Video : भारती सिंगनं डिलिव्हरीच्या २ दिवसांनी मुलाला घेतलं हातात; पाहताच रडायला लागली, नावही ठेवलंय खास

Bharti Singh : कॉमेडी क्वीन भारती सिंगने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दोन दिवसांनी बाळाला हातात घेतल्यावर भारती भावुक झाली आणि रडू लागली.

Shreya Maskar

कॉमेडी क्वीन भारती सिंग दुसऱ्यांदा आई झाली आहे.

भारतीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

बाळाला 2 दिवसांनी पाहिल्यावर भारती भावुक झाली.

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग दुसऱ्यांदा आई झाली. तिने गोंडस मुलाला जन्म दिला. भारतीला 19 डिसेंबरला हर्ष आणि भारतीला मुलगा झाला. भारती सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे युट्यूब चॅनेल देखील आहे. नुकताच त्यांनी बाळाच्या आगमनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात भारती सिंग खूप भावुक झालेली पाहायला मिळत आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया प्रेक्षकांची आवडती जोडी आहे.

भारतीने व्हिडीओत सांगितले की, मुलांच्या जन्मानंतर त्याला लगेच काही वैद्यकीय चाचण्यांसाठी घेऊन गेले. भारतीने दोन दिवसांनी बाळाला पहिल्यांदा हातात घेतले आणि ती रडू लागली. हा क्षण तिच्यासाठी खूपच खास ठरला. भारतीने बाळाचे नाव देखील खूप खास ठेवले आहे. भारती सिंगने आपल्या मोठ्या मुलाचे टोपणनाव गोला ठेवले आहे. तर दुसऱ्या मुलाचे टोपणनाव नाव 'काजू' ठेवले आहे. व्हिडीओत भारती मुलाला घट्ट मिठी मारताना दिसते.

भारतीने सांगितले की, लवकरच काजूचा चेहरा ती चाहत्यांना दाखवणार आहे. बाळ निरोगी आहे. व्हिडीओमध्ये भारती, हर्षची मजा मस्ती पाहायला मिळत आहे. मुंबईतील घरी असताना संध्याकाळी तिला प्रसूतीसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, असे भारतीने सांगितले. चाहते भारतीच्या बाळाला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

2017ला भारती सिंगने लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2022 मध्ये तिने लक्ष सिंग लिंबाचियाला जन्म दिला. लक्षचे टोपणनाव गोला आहे. भारती सिंगने अनेक मुलाखतीत सांगितले आहे की, तिला दुसरी मुलगी हवी आहे. भारती आणि हर्षला मुली खूप आवडतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT