Bhagyalaxmi Actor Akash Choudhary Lonavala Road Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akash Choudhary Accident: लोणावळ्याला जात असताना नवी मुंबईत कारला अपघात; अभिनेता थोडक्यात बचावला

Bhagyalaxmi Fame Actor Accident: ‘भाग्यलक्ष्मी’ मालिका फेम अभिनेता आकाश चौधरी याचा भीषण कारचा अपघात झाला आहे.

Chetan Bodke

Bhagyalaxmi Actor Akash Choudhary Lonavala Road Accident:  ‘भाग्यलक्ष्मी’ (Bhagyalaxmi) मालिका फेम अभिनेता आकाश चौधरी याचा भीषण कारचा अपघात झाला आहे. शनिवारी आकाश आपल्या कारने लोणावळ्याला जात असताना अचानक एका भरधाव ट्रकने अभिनेत्याच्या कारला धडक दिली. यावेळी अभिनेत्यासोबत त्याच्या कारमध्ये त्याचा पाळीव कुत्रा देखील होता. तो त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत मुंबईपासून दूर व्हेकेशनला जात होता. यावेळी अभिनेत्याच्या अपघाताविषयीची माहिती त्याने एका मुलाखतीतून दिला आहे.

टेलिव्हिजन अभिनेता आकाश चौधरी दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मी माझ्या पाळीव कुत्र्यासोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जात होतो, कारण मला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता. नवी मुंबईत माझी कार उभी होती, त्यावेळी एका भरधाव ट्रकने माझ्या कारला मागून येत धडक दिली. माझी कार माझा ड्रायव्हर चालवत होता. त्या अपघाताने माझा जीव घाबरला होता. माझा जीव थोडक्यात वाचला आहे. मी सीटबेल्ट घातल्यामुळे अपघातात माझा जीव वाचला. मी गाडीतून खाली उतरून लगेचच ट्रक ड्रायव्हरसोबत बोलायला गेलो.”

त्यावर मला ट्रक ड्रायव्हर म्हणाला, “मी ब्रेकवर पाय ठेवला नव्हता. या अपघातामागे चूक माझीच होती, मला माफ कर.” तो बिचारा असल्यामुळे मी त्याला फार काही बोललो नाही. गाडीचा अपघात झाल्यावर सहसा अनेक ड्रायव्हर पळून जातात, पण हा पळून गेला नाही. म्हणून मी त्याला माफ करून टाकले.काही वेळातच घटनास्थळी पोलिस येत त्याला अटकही केली. पण थोड्या वेळाने मी त्याला जाऊ दिले. हा अपघात माझ्यासाठी मन सुन्न करणारा अपघात होता.” असं खुद्द अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले.

‘भाग्यलक्ष्मी’ फेम अभिनेता पुढे मुलाखतीत म्हणाला, “अपघातानंतर मी माझ्या ड्रायव्हरसोबत घरी परतलो, दुसरी गाडी घेतली आणि पुन्हा माझ्या सुट्टीसाठी निघालो. या अपघातामुळे माझी फॅमिली देखील खूपच घाबरली. माझी आई देखील खूप घाबरली. मी पुन्हा सुट्टीसाठी जेव्हा निघालो, त्यावेळी माझी आई मला वारंवार फोन करून माझ्या तब्येतीची विचारपुस करत होती. हा मन सुन्न करणारा अपघात झाल्यानंतर मला लोणावळ्याच्या रस्त्याची थोडी भीती वाटते. मला जायचे असेल तर मी फ्लाइट घेऊनच जाईल.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT