Sikander Bharti Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sikander Bharti Dies : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sikander Bharti Passed Away : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. सिकंदर भारती यांचे निधन २४ मे रोजी झाले आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा काय झाला? अद्याप हे कळू शकलेलं नाही. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोक व्यक्त केला जात आहे.

बॉलिवूड सिनेदिग्दर्शक सिकंदर भारती यांच्या पार्थिवावर आज (२५ मे) सकाळी ११ वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी पिंकी आणि तीन मुले सिपिका, युविका आणि सॉक्रेटिस असा परिवार होता.

‘घर का चिराग’, ‘जालीम’, ‘दस करोड रुपये’, ‘भाई भाई’, ‘सैनिक सर उठा के जियो’, ‘दंडनायक’, ‘रंगीला राजा’, ‘पोलिस वाला’ आणि ‘दो फंटूश’ यांसारख्या हिट चित्रपटाचे दिग्दर्शन सिकंदर भारती यांनी केलेले आहे. सिकंदर यांनी राजेश खन्ना, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि गोविंदा यांसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajra Hairstyle: फक्त ५ मिनिटात करा 'ही' गजरा हेअरस्टाईल, हजारो महिलांमध्ये तुम्हीच उठून दिसाल

चौथीतील धनश्री शाळेला निघाली, पण घरी परतलीच नाही; गावाबाहेर तिचं दप्तर सापडलं, अन्... नेमकं काय घडलं?

Headache : हा काय प्रकार! डोक्याच्या उजव्या बाजूलाच सारखं का दुखतंय? वाचा कारणं...

Good News: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट, यापुढे ट्रेन्सला लोणावळ्यात जास्त वेळ थांबावे लागणार नाही

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT