Valmiki Ramayan Saam tv
मनोरंजन बातम्या

Valmiki Ramayan: बॉलीवूडमध्ये मोठी टक्कर; रणबीर कपूरच्या 'रामायण'पूर्वी 'वाल्मिकी रामायण' होणार प्रदर्शित

Valmiki Ramayan: राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर, वाल्मिकी रामायण या चित्रपटाचा 'फर्स्ट लूक' प्रदर्शित करण्यात आला आहे. यासोबतच, निर्मात्यांनी चित्रपटाच्या चित्रपटगृहातील प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. रणबीर कपूरच्या रामायण या चित्रपटापूर्वीच वाल्मिकी रामायण चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

Shruti Vilas Kadam

Valmiki Ramayan: २६ मार्च २०२६ रोजी राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर ‘वाल्मिकी रामायण’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या पोस्टरमध्ये प्रभू श्रीरामांच्या पवित्र पावलांचे दर्शन घडते आणि त्याखाली चित्रपटाचे नाव झळकताना दिसते. या भक्तिमय झलकने प्रेक्षकांची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक  तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवर हे पोस्टर शेअर करताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भावना तलवार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना “जोपर्यंत पर्वत अढळ उभे आहेत आणि नद्या वाहत आहेत, तोपर्यंत रामायण अमर राहील,” असे त्यांनी लिहिले. या पोस्टरमधून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून, ‘वाल्मिकी रामायण’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटामागे उत्तम टेकनिकल टीम कार्यरत आहे. ‘बाहुबली’च्या भव्य सेटसाठी ओळखले जाणारे प्रॉडक्शन डिझायनर साबू सिरिल, सिनेमॅटोग्राफर बिनोद प्रधान आणि ऑस्कर विजेते साऊंड डिझायनररसूल पुकुट्टी हे या चित्रपटात काम करणार आहेत. चित्रपटाची कथा आनंद नीलकांतन यांनी लिहिली असून, संवाद चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी शब्दबद्ध केले आहेत.

दरम्यान, या घोषणेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हा चित्रपट AI-आधारित आहे का, असा सवाल उपस्थित केला, तर काहींनी तो ॲनिमेटेड आहे का, असे विचारले. काही युजर्सनी मात्र रामायणावर आधारित वाढत्या चित्रपटांवर टीका करत, निर्माते केवळ कमाईच्या मागे शोधत असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे, याच वर्षी रणबीर कपूर यांचा ‘रामायण’ चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी हा चित्रपट दोन भागांत आणणार असून, पहिला भाग दिवाळीत रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात साई पल्लवी, सनी देओल आणि यश यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे, ‘वाल्मिकी रामायण’ आणि रणबीर कपूरचा ‘रामायण’ हे दोन रामायणावर आधारित मोठे प्रोजेक्ट्स बॉक्स ऑफिसवर आमनेसामने येणार असल्याने बॉलिवूडमध्ये मोठी स्पर्धा रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वसईतील स्वघोषित भोंदू बाबावर गुन्हा दाखल

Raw Mango Recipe: कच्चा कैरीपासून बनवा 5 चटपटीत पदार्थ, तोंडाला सुटेल पाणी

Lockdown: भारतात लॉकडाऊन लागणार का? केंद्र सरकारकडून आली अधिकृत माहिती, वाचा लेटेस्ट अपडेट

Paytm, PhonePe, Google Pay मधून पैसे गायब होतायेत? AutoPay लगेच बंद करा; १ सेकंदात करा प्रोसेस

Rule Change: LPG गॅसच्या किंमती, इन्कम ते रेल्वे तिकीट; १ एप्रिलपासून ५ नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT