Batman Actor Kevin Conroy Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kevin Conroy Dies: बॅटमॅनचा आवाज हरपला: अभिनेते केविन कॉनरॉय यांचे वयाच्या ६६व्या वर्षी निधन

अभिनेता आणि व्हॉईसओव्हर आर्टिस्ट केविन कॉनरॉय यांच्याविषयी एक दुःखद बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Batman Actor Kevin Conroy Dies: अभिनेता आणि व्हॉईसओव्हर आर्टिस्ट केविन कॉनरॉय यांच्याविषयी एक दुःखद बातमी समोर आली आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी केविन कॉनरॉय यांनी जगाचा निरोप घेतला आहे. केविन कॉनरॉय यांच्या मृत्यूची माहिती त्याची सहकलाकार डायन पर्शिंग यांनी दिली आहे. वॉर्नर ब्रदर्स अॅनिमेशननेही केविन कॉनरॉय यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

केविन यांना कॅन्सर झाला होता. बरेच दिवस ते या आजाराशी झुंज देत होतो. केविन कॉनरॉय यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांना दुःख झाले आहे. केविन यांच्या मृत्यूनंतर वॉर्नर ब्रदर्सनेही इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये वॉर्नर ब्रदर्सनेही केविन यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. केविन यांचा को-स्टार मार्क हॅमिल यांनीही त्यांच्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, 'केविन एक परफेक्शनिस्ट होता. तो या जगातील माझ्या आवडत्या लोकांपैकी एक होता. मी त्याच्यावर भावासारखे प्रेम केले. जवळच्या माणसांची तो काळजी घेत असे. त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याची शालीनता दिसून आली. मी जेव्हा कधी त्याला भेटायचो किंवा बोलायचो तेव्हा मला उत्साहित वाटायचे.' (Hollywood)

'केविन मनाने एक अद्भुत व्यक्ती होता. सगळेजण त्याच्याशी लगेच कनेक्ट व्हायचे. म्हणूनच त्याच्या जाण्याने सगळ्यांना खूप वाईट वाटत आहे.' असे म्हणत बॅटमॅन: अॅनिमेटेड मालिकेचे लेखक पॉल डिनी यांनी केविन कॉनरॉय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण आपापल्या परीने केविनच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. (Social Media)

केविन कॉनरॉय यांनी 80 च्या दशकात अॅक्शन हिरो म्हणून करिअरला सुरुवात केली होती. ते केवळ एक चांगला अभिनेतेच नव्हे तर जगातील सर्वोत्तम व्हॉईसओव्हर आर्टिस्टपैकी एक होते. तसेच त्यांनी बॅटमॅन: द अॅनिमेटेड सिरीज या प्रसिद्ध मालिकेला आवाज दिला होता. तेव्हा ब्रूस वेन उर्फ ​​बॅटमॅन अशीच सर्वत्र चर्चा होत होती. केविन कॉनरॉय आता या जगात नसेल, तरी त्यांचा आवाज चाहत्यांमध्ये नेहमीच राहील. (Actor)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT