Val Kilmer Death google
मनोरंजन बातम्या

Val Kilmer Death : 'बॅटमॅन फॉरएव्हर' अन् 'टॉप गन' स्टार व्हॅल किल्मर यांचं निधन, वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Batman Forever And Top Gun Star Val Kilmer : हॉलिवूड अभिनेते व्हॅल किल्मर यांचे निधन झाले आहे. व्हॅल किल्मर 'बॅटमॅन फॉरएव्हर' आणि 'टॉप गन' या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

Shreya Maskar

हॉलिवूड अभिनेते व्हॅल किल्मर (Val Kilmer Death ) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांना बॅटमॅन फॉरएव्हर आणि टॉप गन यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखले जाते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. ते खूप काळापासून घशाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मीडिया रिपोर्टनुसार, वॅल किल्मर यांचे निधन 1 एप्रिल रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे न्यूमोनियामुळे झाले.

व्हॅल किल्मर यांनी 1986 च्या मेगा बॉक्स ऑफिस हिट 'टॉप गन'मध्ये टॉम क्रूझ सोबत स्पर्धात्मक नौदल एव्हिएटर टॉम 'आइसमन' काझान्स्कीच्या भूमिकेमुळे खूप प्रसिद्ध झाले. 2015 मध्ये त्यांना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले. 2021 जुलैमध्ये कान्स येथे प्रदर्शित झालेल्या त्याच्या जीवनाबद्दलच्या माहितीपटात त्याला श्वासोच्छवासाच्या नळीची गरज असल्याचे दाखवण्यात आले.

व्हॅल किल्मरचे कुटुंब

व्हॅल किल्मरने जोआन व्हॅलीशी लग्नगाठ बांधली. ती त्याला चित्रपटाच्या सेटवर भेटली. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांची नावे मर्सिडीज आणि जॅक आहे. व्हॅल किल्मर बरेच वर्ष सांता फेजवळील एका शेतात राहत होता.

व्हॅल किल्मरचे करिअर

व्हॅल किल्मरला 'बॅटमॅन फॉरएव्हर'मधील ब्रूस वेनच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. गेल्याकाही वर्षात त्यांनी हॉलीवूडमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. टॉप गन, रिअल जिनियस, टॉम्बस्टोन, हीट आणि द सेंट यांसारखे त्यांनी हटके चित्रपट केले आहेत.

व्हॅल किल्मर यांचा जन्म लॉस एंजेलिसमध्ये झाला. त्यांनी हॉलिवूड प्रोफेशनल स्कूल आणि ज्युलिअर्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांची पहिली टीव्ही भूमिका शाळेनंतरच्या विशेष 'वन टू मेनी'मध्ये होती. वॅल किल्मर यांना 2012 मध्ये व्हॅलला झोरोच्या ऑडिओ निर्मितीसाठी 'सर्वोत्कृष्ट स्पोकन वर्ड' ग्रॅमी नामांकन मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

SCROLL FOR NEXT