Sanjay Raut : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Raj Thackeray : 'राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती त्रास होत असेल, याची कल्पना न केलेली बरी, अशा शब्दात संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली.
Sanjay Raut : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Saam tv

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिक : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. काल राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला फतवा असल्याचे संबोधलं. यावरून संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 'राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती त्रास होत असेल, याची कल्पना न केलेली बरी, अशा शब्दात संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली. ते नाशिकमध्ये बोलत होते.

पुण्यात राज ठाकरेंनी फतवा संबोधत केलेल्या आवाहनावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, काही नेते आणि पक्षांची दखल घ्यावी असे वाटत नाही. सध्या लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. राज ठाकरे यांच्या सारखे नेते हे महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील तर बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधन ठाकरे यांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल याची कल्पना न केलेली बरी. अशा कुटुंबातील व्यक्ती त्यांच्यासोबत असणे हे दुर्दैवी आहे'.

Sanjay Raut : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Politics: परळीत धनंजय मुंडेंची भर पावसात सभा; बहिणीच्या प्रचारासाठी भाऊ भिजला; बीडमधील समीकरणं बदलणार?

नरेंद्र मोदींच्या सभेवरून टीका करताना संजय राऊत म्हणाले, 'पंतप्रधान मोदी मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत. त्यांना नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी यांचा काही फायदा होत नाही. राज्यात आम्ही ३५ ते ४० जागा जिंकू. मोदी यांनी मुंबईत पेडर रोडवर घर भाड्याने घ्यावे, आम्ही त्यांच्यासाठी घर पाहतो'.

Sanjay Raut : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
lok sabha Election 2024 : राज्यात प्रचारसभांचा धडाका; आज कोण कुठे सभा घेणार?

तर नाशिकच्या कथित घोटाळ्यावर टीका करताना म्हणाले. '८०० ते ९०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा नाशिकमध्ये झाला आहे. मी १४ तारखेला यावर कागदपत्र सादर करून मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे, राऊत म्हणाले.

मोदींनी दिलेल्या ऑफरवर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांचा कच्चा आहे. त्यांनी मोदींचे भाषण ऐकावे. खरंतर मोदींची तब्येत बिघडली आहे. त्यांना शारीरिक आणि मानसिक उपचाराची गरज आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com