actor John Nolan passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; सिनेविश्वावर शोककळा

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shruti Vilas Kadam

Actor Death: हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेते जॉन नोलन यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन नोलन यांचे निधन ११ एप्रिल रोजी झाले. त्यांचा भाचा दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी लिहीले मी माझा पहिले कलाकार गमावला आहे. अभिनेते जॉन नोलन यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं आहे.

जॉन नोलन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि नातवंडं असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या जाण्याने हॉलिवूडमधील एक महत्त्वाचा कलाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

जॉन नोलन हे प्रामुख्याने बॅटमॅन बिगिन्स, द डार्क नाईट राईजेस आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ‘Person of Interest मधील भूमिकांसाठी ओळखले जात होते. विशेषतः ‘Person of Interest’मधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

त्यांची आणखी एक विशेष ओळख म्हणजे ते प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन आणि लेखक-निर्माते जोनाथन नोलन यांचे काका होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेकदा आपल्या पुतण्यांसोबत काम केलं आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

जॉन नोलन यांची कारकीर्द केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी नाट्य, दूरदर्शन आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून काम करत आपली वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या अभिनयात सहजता होती. ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. त्यांच्या जाण्याने हॉलिवूडमधील एक अनुभवी आणि प्रतिभावान कलाकार कायमचा काळाच्या पडद्याआड गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

SCROLL FOR NEXT