bangladeshi actress raima islam shimu killing case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Murder: अभिनेत्रीच्या हत्येचे रहस्य उलगडले; पतीने रचलेला 'हा' कट पाहून पोलीसही चक्रावले

Actress Murder: प्रसिद्ध अभिनेत्री शूटिंगसाठी घरातून गेल्यानंतर बेपत्ता झाली. २४ तासांनी तिचा मृतदेह गोणीत सापडला. तपासात जवळच्या व्यक्तीने हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला.

Shruti Vilas Kadam

Actress Murder: बॉलिवूड आणि मनोरंजनविश्वाशी संबंधित एका धक्कादायक हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सकाळी घरातून बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचा मृतदेह अवघ्या २४ तासांनंतर एका बॅगेत सापडल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. या हत्येमागे तिच्या पतीचाच हात असल्याचे समोर आले असून, या घटनेने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध अभिनेत्री राइमा इस्लाम शीमूची  16 जानेवारी 2022 रोजी हत्या करण्यात आली. अभिनेत्री सकाळी ७च्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन उचलत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला अभिनेत्री बेपत्ता झाल्याचे वाटत होते. मात्र, अवघ्या २४ तासांत या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले.

रायमा इस्लाम शिमुचा मृतदेह घरापासून काही किलोमीटर अंतरावर झुडपांमागे एका गोणीत आढळून आला. मारेकऱ्यांनी मृतदेहाचे दोन तुकडे केले होते. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अभिनेत्रीच्या घरातील व्यक्तींची चौकशी केली. रायमाचा पती सखावत अली नोबेल, तिची बहीण आणि घरकाम करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. सर्वांनी रायमा सकाळी शूटिंगसाठी घरातून निघाल्याचे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना त्यांच्यावर संशय आला नाही.

यानंतर पोलिसांनी रायमाच्या चित्रपटसृष्टीतील संबंधांची चौकशी केली. काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीचा अभिनेता झायेद खानसोबत वाद झाला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावरही गेला. मात्र, तपासात रायमा आणि झायेद यांचा गेल्या दोन वर्षांपासून संपर्क नसल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी पुन्हा रायमाच्या घरावर आणि तिच्या कारवर लक्ष केंद्रित केले. अभिनेत्री आणि तिचा पती दोघेही एकच कार वापरत असल्याने त्या कारची तपासणी केली. या कारमधून ब्लीचिंग पावडरचा तीव्र वास येत असल्याचे आढळले. पोलिसांना कारमध्ये गोणी बांधण्यासाठी वापरलेली दोरीही सापडली. मृतदेहाची विल्हेवाट लावताना पुरावे नष्ट करण्यासाठी ब्लीचिंग पावडरचा वापर केल्याचा संशय पोलिसांना आला.

यानंतर रायमाचा पती सखावत अली याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले. या हत्येत त्याचा मित्र अब्दुल्ला यानेही मदत केल्याचे तपासात उघड झाले. तपासानुसार, कोविड-१९च्या काळात कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. १६ जानेवारीला रायमा आणि तिच्या पतीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सखावत अलीने तिच्यावर हल्ला केला आणि गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मित्राच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

रायमा इस्लाम शिमुने बांगलादेशी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत काम केले होते. तिने सुमारे २५ चित्रपट आणि ५० हून अधिक नाटकांमध्ये काम केले होते. लग्नानंतर तिने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आणि नंतर कार्यक्रम निर्मितीच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

500 जणांचा मृत्यू; मशिद उद्ध्वस्त, सैन्याचे हवाई दलही संपुष्टात! भीषण मिसाइल हल्ल्याने जगात खळबळ

Mumbai : मुंबईकरांना मोठा दिलासा! ७ तलावांमध्ये ९६.६१ टक्के पाणीसाठा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

SCROLL FOR NEXT