Neha Marda Gave Birth To A Baby Girl Instagram
मनोरंजन बातम्या

Neha Marda: 'बालिका वधू' फेम अभिनेत्री तब्ब्ल ११ वर्षांनी झाली आई; नेहा मर्दाने दिला गोंडस मुलीला जन्म

Balika Vadhu Fame Actress: अभिनेत्री नेहा मर्दा आई झाली आहे.

Pooja Dange

Neha Marda Gave Birth To A Baby Girl: 'बालिका वधू', 'डोली अरमानो की' अशा अनेक टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री नेहा मर्दा आई झाली आहे. काल संध्याकाळी तिने एका परीला जन्म दिला आहे. गुरुवारी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्भधारणेशी संबंधित समस्यांमुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. प्रसूतीपूर्वी तिने हॉस्पिटलच्या बेडवरून स्वतःचे दोन फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये ती तिच्यावर उपचार घेताना दिसत होती.

प्रसूतीनंतर ETimes ला दिलेल्या मुलाखतीत नेहा मर्दा म्हणाली, “गर्भधारणेनंतर माझा बीपी वर-खाली होऊ लागला, त्यामुळे मला काळजी वाटू लागली आणि 5 व्या महिन्यात बीपी अनियमित झाला. आमच्या डॉक्टरांनी याविषयी आम्हला आधीच सांगितले होते. अनेक समस्या अपेक्षित होत्या पण आम्ही नशीबवान होतो की सर्व काही ठीक झाले.

नेहा मर्दा पुढे म्हणाली, “मला आनंद आहे की हा टप्पा पूर्ण झाला आणि मला एक सुंदर मुलगी मिळाली आहे. आम्ही दोघी उत्तम आहोत." नेहाने असेही सांगितले की ही प्री-मॅच्युरिटी डिलिव्हरी होती. ती आणि तिची मुलगी अजूनही रुग्णालयात आहेत, परंतु लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

नेहा मर्दा पुढे म्हणाली, “मला या आठवड्याच्या शेवटी आणि माझ्या मुलीला 15-20 दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. मला फक्त माझ्या बाळाला कवेत घेऊन त्याच्याकडे प्रेमाने पाहायचे आहे. प्री-मॅच्युअर बेबी असल्याने तिला एनआयसीयूमध्ये नेण्यापूर्वी काही काळ ती माझ्यासोबत होती. ती अशक्त आहे, तिचे वजन थोडे वाढवावे लागेल."

नेहा मर्दा मुलीच्या नावाबाबतही बोलली. काही नावांचा विचार करत असल्याचे तिने सांगितले. त्यांच्या कुटुंबातील प्रथेनुसार नवजात बाळाची आत्या म्हणजेच नेहाची नणंद बाळाचे नाव ठेवते.

नेहा म्हणाली, “मला खात्री आहे की ती खूप छान नाव ठेवेल. आम्ही ए ने सुरू होणारे नाव शोधत आहोत. मुळाक्षराच्या पहिल्या अक्षराप्रमाणे, मला वाटते की माझी मुलगी आयुष्यात नेहमीच वेगळी असेल."

नेहाने फेब्रुवारी 2012 मध्ये पाटण्यातील बिजनेसमॅन आयुष्मान अग्रवालशी लग्न केले. त्यांना ११ वर्षांनी बाळ झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात; केमिकलमुळे चक्क रस्ताच झाला गुलाबी, VIDEO

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

SCROLL FOR NEXT