Aaishvary Thackeray SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांचा नातू करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण,पहिला सिनेमा कोणता?

Aaishvary Bollywood Debut : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचा पहिला चित्रपट कोणता? जाणून घ्या.

Shreya Maskar

बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचे कुटुंबाला राजकीय वारसा आहे. मुलगा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , पुतण्या राज ठाकरे (Raj Thackeray) दोघेही राजकारणात आघाडीचे नेते आहेत. तर उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील राजकारणात सक्रिय आहे.

आता ठाकरे कुटुंबाच्या एका सदस्याने बॉलिवूडची साथ पकडली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याने करिअर म्हणून बॉलिवूडची निवड केली आहे.

ऐश्वर्य ठाकरेचा पहिला सिनेमा 2025मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. ऐश्वर्य ठाकरे हा स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) यांचा मुलगा आहे. स्मिता ठाकरे (Smita Thackeray) या सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्मात्या आहेत.

जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे हे 2004 मध्ये विभक्त झाले. ऐश्वर्य ठाकरे कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे.

ऐश्वर्य हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या विविध लूकमधील फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करतो. या आधी ऐश्वर्यने चित्रपटासाठी काम केले होत. त्याने 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केल होतो. हा चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी होते. ऐश्वर्यने चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्याला अभिनय करायला खूप आवडतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT