Baipan Bhari Deva  Saam TV
मनोरंजन बातम्या

Baipan Bhari Deva : 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात गाठला कोट्यवधींचा पल्ला ; केदार शिंदेंची पोस्ट बघाच

Baipan Bhari Deva Box Office Collection : पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Baipan Bhari Deva First Week Collection : केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त एक आठवडा झाला आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

बायकांच्या धावपळीच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोट्यवधींच्या घरात कमाई केली होती. बायकांनी तर हा चित्रपट आवर्जुन पाहिला आहे. या चित्रपटाची गोष्ट मात्र प्रत्येक बाईला आपलीच असल्यासारखी वाटते. प्रत्येक स्त्री स्वतः ला त्या चित्रपटाशी रिलेट करते.(Latest Entertainment News)

'बाईपण बारी देवा' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चागंलीच कमाई झाली आहे. चित्रपटाने १२.५० कोटींचा पल्ला पार केला आहे. चित्रपटाला या वीकेंडला जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तीवली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदेनी ही माहिती सोशल मीडियावरुन दिली. मराठी चित्रपटासाठी ही खूप चांगली बातमी असल्याचे म्हटलं जात आहे.

केदार शिंदेनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत, 'माझ्या आयुष्यात आलेल्या असंख्य स्त्रियांच्या आशिर्वादाने हे यश मिळालंय. मला जन्म देणारी आई... सांभाळणारी आजी.. लक्ष ठेवणाऱ्या मावश्या... मला लग्नानंतर सांभाळून घेणारी माझी बायको.. आनंद देणारी माझी मुलगी.. माझ्या प्रत्येक कामात सहभागी असणारी माझी सहकारी, अभिनेत्री आणि माझ्या कामावर प्रेम करणारी स्त्री प्रेक्षक.. हे तुमचं यश आहे. या सिनेमातली प्रत्येक स्त्री जी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तिचं हे यश आहे. मी फक्त निमित्त मात्र!! ही स्वामीआई ची कृपा हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद... असं कॅप्शन दिले आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटात सहा बहिणींची गोष्ट आहे. या सहाजणी त्यांच्या आयुष्यात एवढया व्यस्त आहेत की एकमेकींना भेटायला वेळच मिळत नाही. त्यामुळे स्वतः साठी वेळ काढणे ही गोष्टचं उरली नाही.चित्रपटात या सहा बहिणी मंगळागौरीनिमित्त एकत्र येतात. आणि काय धमाल करतात हे चित्रपट पाहूनच कळेलं. बायकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाला मुख्यतः बायकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

SCROLL FOR NEXT