Badshah Apologises To Shivbhakta Instagram
मनोरंजन बातम्या

Badshah Apologises To Shivbhakta: ‘सनक’ गाण्यावरुन वाद वाढला, रॅपर बादशाहने माफी मागत उचललं मोठं पाऊल...

‘सनक’ गाण्यावरून वाढत चाललेला वाद पाहून अखेर बादशाहने माफी मागीतली आहे. नुकतंच बादशाहने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत गाण्याबद्दल माफी मागितली.

Chetan Bodke

Badshah Apologises To Shivbhakta: बॉलिवूडचा रॅपर बादशाह नेहमीच आपल्या गाण्यांनी चर्चेत राहतो, पण यावेळी त्याचं गाणंच त्याच्या अंगलट आलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘सनक’ या गाण्याने अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत . ‘सनक’ गाण्यावरून वाढत चाललेला वाद पाहून अखेर बादशाहने माफी मागीतली आहे. नुकतंच बादशाहने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत गाण्याबद्दल माफी मागितली.

नक्की वाद काय आहे?

रॅपर बादशाहचे नवं अल्बम साँग प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर बराच वाद उफाळून आला आहे. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर शिभक्तांनी रॅपरवर एफआयआर नोंदवली. रॅपर बादशाहने नव्या गाण्यात भगवान शंकराचा उल्लेख केला होता. या गाण्याचे बोल अश्लील असल्याचे म्हणत महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांसोबतच संत- महंतांनीही त्याच्या अल्बमवर तीव्र आक्षेप घेतला.

रॅपर बादशाहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सनक अल्बममधील एका गाण्याने महाकालचे अनेक पुजारी संतापले आहेत. इंदूर येथील ‘परशुराम सेना’ या संघटनेने देखील गायक बादशाहवर एका नवीन गाण्याबद्दल ‘भोलेनाथ’ हा शब्द वापरल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बॉलिवूडचा रॅपर बादशाह म्हणतो, ‘माझ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सनक’ या गाण्याने काही शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचे मला कळले. मला कधीच कळत- नकळत कुणाला दुखवाण्याचा विचार नव्हता. मी माझी कलात्मक निर्मिती आणि संगीत रचना माझ्या चाहत्यांसाठी खूप प्रामाणिकपणे आणि उत्साहाने घेऊन येत असतो. नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर याबाबत ठोस पावले उचलत मी माझ्या गाण्यांचे काही भाग बदलले आहेत. माझं ते जुनं गाणं सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून डिलीट करत नवं गाणं शेअर केले जाईल, जेणेकरून इतर कोणाच्याही भावना दुखावल्या जाईल असा माझा मानस नव्हता.’ (Bollywood News)

बादशाह आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, ‘गाण्यामध्ये बदल करण्यासाठी थोडा वेळ लागेल, त्यानंतर नवीन गाणं सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसेल. तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा ही नम्र विनंती. मी त्या सर्व लोकांची मनापासून माफी मागतो, ज्यांना मी नकळत दुखावले आहे. माझे चाहते नेहमीच माझा सर्वात मोठा आधार आहेत, म्हणूनच मी त्यांना नेहमीच महत्त्व देतो आणि त्यांच्यावर अपार प्रेम करतो. तुम्हा सर्वांना माझे खूप खूप प्रेम.’ (Entertainment News)

बादशाहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यावरून सध्या सर्वत्र वाद सुरू आहे. रॅपरने गाण्यात महादेवाच्या नावाचा वापर केला असून ज्यावर महाकालेश्वर मंदिरातल्या पुजाऱ्यांसह अनेक शिवभक्तांनी बादशाहवर तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. महादेवाच्या नावाने आक्षेपार्ह शब्द वापरल्याने उज्जैन महाकालेश्वर मंदिराचे पुजारी देखील बादशाहवर चांगलेच संतापले. गाण्यात जर बदल केला नाही तर गायकाविरुद्ध एफआयआर दाखल करू, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT