Babu Movie Trailer Released  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Babu Movie Trailer : ‘हनुमानाची गदा अन् ‘बाबू’चा वादा...’, अस्सल ॲक्शनपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Babu Movie Trailer Out : "बाबू नाय, बाबू शेठ..." या डायलॉगची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. हा डायलॉग ‘बाबू’ चित्रपटातील असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

Jyoti Shinde

"बाबू नाय, बाबू शेठ..." या डायलॉगची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'बाबू' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज झाला होता. आता या 'बाबू' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणाऱ्या 'बाबू'चा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एन्ट्री केली. तर 'बाबू'नेही त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एन्ट्री घेतली. यावेळी ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला.

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT