Irfan Khan And Babil Khan
Irfan Khan And Babil Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Babil Khan: बाबिल खानची वडिलांसाठी खास पोस्ट, बाबांच्या खास गोष्टी सांगताना झाला भावुक

Chetan Bodke

Babil Khan Post: इरफान खान (Irrfan Khan) बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्यांपैकी म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या निधनानंतर त्याच्या मुलाने म्हणजेच बाबिलने (Babil Khan) मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. नुकतेच बाबिल खानने त्याचे दिवंगत वडील इरफान खानच्या काही वस्तूंचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या त्या वस्तू पाहताच आजही त्याला वडिलांची आठवण येते.

बाबिलने आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत इरफानने 'द नेमसेक' चित्रपटात वापरलेली परफ्यूमची बाटली दाखवली होती . दुसऱ्या चित्रात त्याच परफ्यूमच्या बाटलीचा क्लोज अप शॉट होता. शेवटी, बाबिलने ज्युरासिक वर्ल्डच्या सेटवरून त्याच्या वडिलांची खुर्ची असलेला एक फोटो शेअर केला आहे.

या संस्मरणीय वस्तू शेअर करताना त्यांनी लिहिले, “म्हैसूरमध्ये अभिनय कार्यशाळेसाठी निघत आहे. मला मामाच्या फार्महाऊसवर माझ्या वडिलांच्या सापडलेल्या काही गोष्टी शेअर कराव्या असे वाटले. 1 आणि 2 अशोकासाठी खास मिक्स परफ्यूम आणि'द नेमसेक' मधील बाबांचे पात्र. 3. ज्युरॅसिक वर्ल्डचे शूटिंग करताना बाबांसाठी खास अभिनेत्याची खुर्ची. पार्टी संपली, पुन्हा एकदा कामासाठी जातोय, लवकरच भेटू.”

वडील इरफान खान यांच्या निधनानंतर बाबिल नेहमीच त्याच्याशी संबंधित पोस्ट शेअर करत आहे. इरफानचे कर्करोगाशी दोन वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर एप्रिल 2020 मध्ये निधन झाले. अखेरचा श्वास घेण्यापूर्वी त्यांनी राधिका मंदान्ना, करीना कपूर आणि दीपक डोबरियाल यांच्यासोबत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात काम केले होते.

बाबिल खानने 'काला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

Mumbai Court Raps Ed: खटल्याला उशीर झाला, आरोपींनी अधिकची शिक्षा भोगली, ईडीला कोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT