Babil Khan Instagram @babil.i.k
मनोरंजन बातम्या

Babil khan: अनन्या, अर्जुनसारखे लोक...; इरफान खान यांच्या मुलाने रडत सांगितले बॉलीवूडचं 'हे' सत्य, नंतर केलं इंस्टाग्राम डिलिज

Babil khan cried: दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खानने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला होता, यामध्ये रडत रडत बॉलीवूडमधील बनावटपणावर भाष्य करताना दिसत आहे.

Shruti Vilas Kadam

Babil khan cried: दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खानने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला होता, यामध्ये रडत रडत बॉलीवूडमधील बनावटपणावर भाष्य करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने अनन्या पांडे, अर्जुन कपूर यांसारख्या कलाकारांचा उल्लेख करत बॉलीवूडमधील बनावटपणावर टीका केली. हा व्हिडिओ नंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवण्यात आला, परंतु तोपर्यंत तो व्हायरल झाला होता. आता त्याने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट देखील डिलिट केलं आहे.

बाबिलने या व्हिडिओत म्हटले की, "बॉलीवूडमध्ये सर्व काही बनावट आहे. अनन्या पांडे, अर्जुन कपूर, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजित सिंग सारखे लोक फक्त दिखावा करतात." या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. काहींनी बाबिलच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले, तर काहींनी त्याच्या या वक्तव्यावर टीका केली.

या घटनेनंतर बाबिलने एक मोठी पोस्ट शेअर केली, यामध्ये त्याने स्पष्ट केले की, त्याचे वर्तन बनावट नाही, तर तो जसा आहे तसाच वागतो. त्याने लिहिले, "मी जसा आहे तसाच वागतो, तेच माझे खरे रूप आहे. मला बनावटपणा आवडत नाही." त्याने हेही कबूल केले की, प्रसिद्धीशी जुळवून घेणे त्याच्यासाठी कठीण आहे, परंतु तो प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो.

बाबिलच्या या भावनिक उद्रेकामुळे बॉलीवूडमधील बनावटपणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे इंडस्ट्रीतील काय होते आणि प्रेक्षकांना काय दाखवले जाते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच बाबिलच्या अचानकपणे असे भावना व्यक्त करण्यामागे नेमकं कारण काय असाही प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT