Dream Girl 2 News  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dream Girl 2 News : अरेच्चा! रिलीज तोंडावर असताना ड्रिम गर्ल २ चं शुटींग पुन्हा होणार? निर्मात्यांनी सांगितले हे कारण

Ayushmann Khurrana Dream Girl 2 Reshoot : 'ड्रिम गर्ल २' चित्रपटाच्या शुटिंगच्या ब्रेकनंतर आता पुन्हा आयुष्मान चित्रपटाच्या शुटिंगसाठी सज्ज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dream Girl 2 Movie Update : गायक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका पार पाडणारा कलाकार म्हणजे आयुष्मान खुराना.आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या शुटिंगच्या ब्रेकनंतर आता पुन्हा आयुष्मान चित्रपटाच्या शुटिंगसाठी सज्ज झाला आहे.

अनन्या पांडे आणि आयुष्मान खुराना ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या शुटिंगबाबत अनेक अपडेट समोर येत आहे. एका वृत्तानुसार, ड्रिम गर्ल २ चित्रपटाचे रिशूट सुरु झाले आहे. चित्रपटाचे पुन्हा शुटिंग करण्यामागे कारण काय आहे? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहे.या चर्चांवर आता चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्यने मौन सोडले आहे.

एका मुलाखतीत दिग्दर्शक राज शांडिल्य म्हणाले,' हे रीशूट नाही आहे. हे आमचे उरलेले शूटिंग आहे. एक गाणे आहे जे आम्ही अजून शूट केलेले नाही. ते शूट करायचे आहे. हे पूर्ण रीशूट नाही तर उर्वरित शॉट्स आणि एक उरलेले एक गाणे आहे जे अद्याप चित्रित करण्याचे राहिले आहे. त्याच शुटिंग आहे'.

एका सुत्रानुसार, दिग्दर्शक राज शांडिल्य आणि निर्माती एकता कपूरने चित्रपटाचा फर्स्ट कट पाहिला आहे. ते तयार झालेल्या चित्रपटावर खूश आहेत. परंतु सुधारणा करता येऊ शकते. असे त्यांना वाटले. त्यानंतर ते आयुष्मान आणि इतरांशी बोलले. त्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम रिशूट करण्यासाठी तयार झाली. चित्रपटाच्या शुटिंगचे शेड्यूल 12 दिवसाचे आहे. या महिन्याच्या सुरुवातीला शुटिंग सुरू झाले तर 15 जुलैला शुट पूर्ण होईल.हे शूट मध आयलॅंडला होत आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेत अजिबात बदल झालेला नाही. राज शांडिल्यने रीशूटवर काम सुरू केले.चित्रपटाचे संपूर्ण काम प्रदर्शनाच्या आधीच होईन. असा विश्वास आहे. दरम्यान, बालाजी टेलिफिल्म्स टीम आधीच मार्केटिंग प्लॅनवर काम करत आहे.

ड्रिम गर्लच्या यशानंतर 'ड्रिम गर्ल २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ड्रिम गर्ल २' मध्ये आयुष्मान खुराना, अनन्या पांडे, परेश रावल,अनू कपूर,राजपाल यादव अशी स्टारकास्ट दिसणार आहे.चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिरपूर विमानतळ येथे आगमन

Jowar Bhakri Benefits: उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी शरीराला कसं थंड ठेवते? वाचा फायदे

Paytm वर बंदी; आता तुमच्या पैशाचं काय होणार? RBI ने दिली महत्वाची माहिती! Fastag वरही अपडेट

Harbhajan Singh : गद्दार! हरभजन सिंह भाजपाच्या वाटेवर, कार्यकर्ते संतापले, पाहा व्हिडिओ

Tan Removal Home Remedies: उन्हाळ्यात होणारी टॅनिंग घालवण्यासाठी या ७ घरगुती उपायांपैकी १ करा नक्की ट्राय

SCROLL FOR NEXT