Baipan Bhaari Deva News : मी कित्येक रात्री रडलोय... 'बाईपण भारी देवा' दरम्यानची भावनिक आठवण केदार शिंदेंनी केली शेअर

Baipan Bhaari Deva Marathi Movie : चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करत आहे पण चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अनेक संकंटाना सामोरे जावे लागले आहे.
Baipan Bhaari Deva
Baipan Bhaari DevaSaam Tv
Published On

Kedar Shinde on Baipan Bhaari Deva Marathi Movie : केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करत आहे पण चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अनेक संकंटाना सामोरे जावे लागले आहे. चित्रपटासाठी निर्माता नव्हता अशी खंत केदार शिंदेनी व्यक्त केली.

केदार शिंदेच्या बाईपण भारी देवाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.पण या चित्रपटासाठी निर्माता भेटत नसल्याची माहिती केदार शिंदेनी दिली.चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी ३ वर्ष वाट पाहावी लागली.हीच स्वामींची इच्छा असावी, अंसही केदार शिंदेनी म्हटलं आहे.

Baipan Bhaari Deva
Sunil Shetty's Controversy On Tomato : टॉमेटोच्या भाववाढीच्या वक्तव्यावर सुनील शेट्टीची माघार;माफी मागत म्हणाला,"मी कधीच शेतकऱ्यांच्या..."

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदेनी बाईपण भारी देवा चित्रपट प्रदर्शित होणाआधी आलेल्या अडचणीविषयी सांगितले. 'तूम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण तब्बल नऊ महिने चित्रपटासाठी निर्माता भेटत नव्हता. या काळजीने कित्येक रात्री मी रडलोय. अनेकांनी स्क्रिप्ट पाहिल्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

६ बायकांचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात कोण येणार? असे अनेक प्रश्नही उपस्थित केले होते. चित्रपटाची गोष्ट मी रंजक करुन ऐकवायचो. शेवटी माझे प्रयत्न यशस्वी ठरले. जिओ स्टुडिओने या चित्रपटाला निर्मिती कराण्याचा निर्णय घेतला. तो आमचा सर्वात मोठा विजय होता. निखिल सानेमुळे या चित्रपटाला उच्च दर्जा मिळाला'.असं केदार शिंदे म्हणाले.

Baipan Bhaari Deva
Deepika Padukone In Project K : तिच्या नजरेत जादू आहे... 'प्रोजेक्ट के'मधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक आऊट

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट हिट ठरला आहे. चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, 'आम्ही आमचे काम मन लावून केले. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आम्ही आमचे काम केले. गीतेत आधीच म्हटले आहे की, करम करो,फल की अपेक्षा मत करो. मी स्वतः स्वामी समर्थांची पूजा करतो. माझ्या मेहनतीमुळे त्यांनी मला नेहमीच सर्वकाही दिले. मी नाटकं, टेलिव्हिजन शो आणि चित्रपट केले. मी काही महत्त्वाच्या कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे'.

'२०२०मध्ये शुटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी टीमला मात्र खूप वाट पाहावी लागली. तो काळ खूप कठीण होता. पण मला वाटायचे की, आम्ही चांगली कामगिरी केली आहे. त्यावेळी स्वामी समर्थांची इच्छा काय होती हे मला माहीत नव्हते. कदाचित हीच त्यांची इच्छा होती. काही वेळा जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत, तेव्हा तुम्ही सर्व काही देवावर सोडायला पाहिजे'.असं केदार शिंदे म्हणाले.

'आमच्या लेखिका वैशाली नाईक यांनी मला कथा ऐकवल्यावर, मी ज्या सहा अभिनेत्रींचा विचार केला होता त्या याच सहाजणी होत्या, मला एखाद्या भूमिकेत हवी असलेली अभिनेत्री न मिळाल्याने मी दुसऱ्या अभिनेत्रीकडे जाण्याचा प्रसंग मला आला नाही. त्या प्रत्येकीसाठी एक दर्जेदार भूमिका होती. तुम्ही कास्टिंगमध्ये ५०% पेक्षा जास्त जिंकल्यास, उरलेला प्रवास सोपा होतो. पण माझ्या बाबतीत, मी कास्टिंगमध्ये 100% जिंकलो. या सर्वच अभिनेत्री चांगल्या आहेत, त्यामुळे त्या चांगला अभिनय करतील. त्यांना तेवढी समज आहे'.असं केदार शिंदे म्हणाला.

चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब या सहा जणींनी मूख्य भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com