Ayushmann Khurrana Father Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ayushmann Khurrana Father Passes Away: आयुष्मान खुरानावरील पितृछत्र हरपलं; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर...

प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आणि अभिनेता आयुष्मान खुरानाचे वडिल पी खुराना यांचे आज सकाळी निधन झाले.

Chetan Bodke

Ayushmann Khurrana Father Passes Away: प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आणि अभिनेता आयुष्मान खुरानाचे वडिल पी खुराना यांचे आज सकाळी चंदीगड येथे निधन झाले. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चंदीगड येथील मणिमाजरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या २ दिवसांपूर्वी पी खुराना यांना पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांच्यावर २ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.

आयुष्मानचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने माध्यमांसमोर निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की,“अत्यंत दु:ख होत आहे की, आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील ज्योतिषाचार्य पी खुराना यांचे आज सकाळी १०:३० वाजता मोहाली येथे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून एका दुर्धर आजाराने त्रस्त होते. कठीण वेळी आमच्या पाठी उभे राहिलात, आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.” (Bollywood Actor)

आयुष्मान खुरानाच्या आयुष्यात वडिलांचे वेगळेच स्थान होते. आयुष्मान त्याच्या वडिलांना नेहमीच आपल्या रियल लाईफमधील हिरो मानायचा. आयुष्मानने फादर्स डे निमित्त वडिलांसाठी एक नोटही पोस्ट केली आहे.

ज्यामध्ये आयुष्मान म्हणतो, “माझ्या वडिलांनी कायद्याचे शिक्षण घेतले होते, पण त्यांनी ज्योतिषी बनणे पसंत केले. त्यांना संगीत, कविता आणि कला यांची भरपूर जाण आहे. त्यांच्याकडूनच मला कलेची आवड निर्माण झाली. आज मी जो काही आहे, त्यात माझ्या वडिलांचा मोठा हात आहे. तुम्हीच आम्हाला शिस्त शिकवली आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली..” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

आखाती युद्धाला 50 दिवस पूर्ण, इराणच्या मोजताबा खोमेनींचा मृत्यू?

शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच, महिन्याभरात 18 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मोठा दहशतवादी हल्ला; मालीत एकाच वेळी अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट, संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT