Ayan Mukerji Got 32 Crores For War 2: हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर ‘वॉर २’चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून अयान मुखर्जी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा देखील बरीच झाली होती. त्यानंतर ज्यू.एनटीर नक्की ‘वॉर २’चा भाग असेल की नाही, यामध्ये देखील सर्व बुचकळ्यात पडले होते. अशातच नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, ज्युनियर एनटीआर अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’चित्रपटाचा भाग होणार आहे. सोबतच अयान मुखर्जी देखील ‘वॉर २’चे दिग्दर्शन करणार असून त्यासाठी त्याने तगडी फीही आकारली आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट अयान मुखर्जीने यशराज फिल्म्ससोबत काम करावं असे आदित्य चोप्राचे मत होते. अयानने त्याच्या बॅनरचा पुढचा चित्रपट ‘वॉर २’ चे दिग्दर्शन करावे अशी आदित्यची इच्छा आहे. अयान किंवा यशराज फिल्म्सने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
पण आदित्य चोप्राने ‘वॉर २’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी अयान मुखर्जीकडे दिल्याचे बोलले जात आहे. ‘वॉर २’देखील हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असून यामध्ये ‘टायगर ३’, ‘वॉर २’ आणि ‘पठान’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
रिपोर्ट्सनुसार, ‘वॉर २’ हा स्पाय युनिव्हर्स चित्रपट असून त्याची Larger Then Life स्वरूपात शूटिंग केली जाणार आहे. त्यासाठी खूप वेळ आणि विशेष मेहनत देखील घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अयान मुखर्जीला ‘ब्रह्मास्त्र’च्या सिक्वेल साठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. ‘वॉर २’साठी अयान मुखर्जीलाही मोठी रक्कम मिळत असून आदित्य चोप्राने दिग्दर्शकाला ३२ कोटी रुपये फी दिल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. एवढी मोठी रक्कम मिळाली असेल, तर अयान मुखर्जीला ‘वॉर २’ मधील आदित्य चोप्राच्या अपेक्षा आणि विश्वासावर नक्कीच विश्वास ठेवावा लागेल.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयान मुखर्जी एप्रिल 2023 पासून ‘वॉर २’ च्या प्री-प्रॉडक्शनसाठी सुरूवात करणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग या वर्षी नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’चा दुसरा भाग २०२६ मध्ये तर तिसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानुसार अजून अयानकडे त्याच्या चित्रपटासाठी बऱ्यापैकी वेळ असल्याचे समजले जाते. सोबतच अयानकडे सध्या एकूण तीन बिग बजेट चित्रपट असून त्याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या. ‘वॉर २’ मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर सोबत आलिया भट्ट देखील दिसणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.