Nandini Gupta wins Femina Miss India: 19 वर्षीय नंदिनी गुप्ता ठरली फेमिना मिस इंडिया 2023

Nandini Gupta wins Femina Miss India 2023: नंदिनी गुप्ता ही २०२३ची फेमिना मिस इंडिया ठरली आहे.
19 year old Nandini Gupta Become Femina Miss India 2023
19 year old Nandini Gupta Become Femina Miss India 2023Instagram @missindiaorg
Published On

Rajasthan's Nandini Gupta wins Femina Miss India 2023: नंदिनी गुप्ता ही २०२३ची फेमिना मिस इंडिया ठरली आहे. अवघ्या १९ व्या वर्षी नंदिनीने हे विजेतेपद तिच्या नावावर केले आहे. नंदिनी राजस्थान, कोटा येथील आहे. तिच्यासोबत, दिल्लीच्या श्रेया पुंजा हिने फेमिना मिस इंडिया 2023 १ ली रनर-अप आणि मणिपूरच्या थौनाओजम स्ट्रेला लुवांग २ री रनर-अप ठरली आहे. फेमिना मिस इंडिया 2023 - इम्फाळ, मणिपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

नंदिनीने बिसनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली आहे. लहानपणी, नंदिनीने उत्कृष्ट आदरातिथ्य कौशल्य दाखवले आणि मिस इंडिया सौंदर्य स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला. ती एक मॉडेल आणि विद्यार्थिनी आहे. (Latest Entertainment News)

19 year old Nandini Gupta Become Femina Miss India 2023
Marathi Movie: 'माहेरची साडी'चे निर्माते-दिग्दर्शक विजय कोंडके यांचा 'लेक असावी तर अशी' लवकरच होणार प्रदर्शित

फेमिना मिस इंडियाची 59 वा सोहळा यावर्षी खुमन लम्पक, इंफाळ, मणिपूरमध्ये येथील इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. तरुण प्रतिभावान महिलांचे जीवन बदलण्याचा आणि ग्लॅमरचा लँडस्केप आणि भारताच्या फॅशन उद्योगात बदल घडवून आणण्याचा सुमारे सहा दशकांचा प्रसिद्ध वारसा, प्रभावशाली ब्युटी अॅम्बेसेडर तयार करणे आणि तरुण महिलांमध्ये सकारात्मक शक्ती क्षमता वाढविणे आणि त्यांना सक्षम बनवणे.

15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेला ग्रँड फिनाले समारंभ हा अनेक स्टार उपस्थित होते आणि सौंदर्याचा उत्सव साजरा करण्यात आला. सायनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, मनसा वाराणसी, मनिका शेओकंद, मन्या सिंग, सुमन राव आणि शिवानी जाधव या माजी विजेत्या या कर्यकर्मल हजर होत्या.

सिनी शेट्टी, मोहेचे उत्कृष्ट आणि बारीक कलाकुसर केलेले लेहेंगा परिधान करून या कार्यक्रमाच्या संध्येला सुरुवात झाली. बॉलिवूडचा शेहजादा कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

संध्याकाळच्या या डोहाळ्याचे सूत्रसंचालन मनीष पॉल आणि भूमी पेडणेकर या डायनॅमिक जोडीने केले ज्यांनी प्रेक्षकांना त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि संवाद कौशल्यानें गुंतवून ठेवले.

फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स 2002 आणि मेंटॉर नेहा धुपिया, बॉक्सिंग आयकॉन लैश्राम सरिता देवी, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक हर्षवर्धन कुलकर्णी आणि प्रतिष्ठित डिझायनर रॉकी स्टार आणि नम्रता जोशिपरा यांचा समावेश असलेल्या एलिट पॅनेलद्वारे फेमिना मिस इंडियाच्या विजेत्यांची निवड करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com