Avdhoot Gupte-Kareen Kapoor News Saam TV
मनोरंजन बातम्या

Avdhoot Gupte News : करिना कपूरमुळे नापास झाला होता अवधूत गुप्ते; कॉलेजमधील किस्सा अनेकांना माहित नसेल

Avdhoot Gupte-Kareena Kapoor News : मराठी यूट्यूब चॅनेल 'मराठी किडा'वर अवधूतची एक मुलाखत नुकसाच पब्लिश झाली आहे.

प्रविण वाकचौरे

Avdhoot Gupte News : अवधूत गुप्ते हे दिलखुलास व्यक्तमत्व अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. संगीतकार, गायक, दिग्दर्शक, निर्माता, मुलाखतकार अशा अनेक भूमिका त्याने चाबूक वठवल्या आहेत. आयुष्यातील करिअर प्रत्येक टप्प्यावर डिस्टिक्शनने पास होणार अवधूत गुप्ते कॉलेजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरमुळे नापास झाला होता.

मराठी यूट्यूब चॅनेल 'मराठी किडा'वर अवधूतची एक मुलाखत नुकतीच पब्लिश झाली आहे. यामध्ये अवधूतने त्याच्या कॉलेज आयुष्यातील एक अनुभव शेअर केला आहे. करिना कपूर त्याच्या वर्गात बसत असल्याचा एक भन्नाट किस्सा त्याने सांगितला.

अवधूत गुप्ते कॉलेजला असताना परीक्षेत ज्या वर्गात त्याचा नंबर आला होता, तिथेच करिना कपूरचाही नंबर होता. मात्र करिना कपूर वर्गात बसत असल्याने त्याचं पेपरमध्ये लक्षच लागायचं नाही. करिना कपूर बाजूला बसलेली असेल तर काय होणार. पेपरमध्ये लक्ष कमी आणि तिच्याकडेच लक्ष जायचं. त्यामुळे तो नापास झाला, असं अवधूतने सांगितलं.

त्यावेळी करिना बरीच जाड होती. एका बाकावर एकच बसेल अशी होती. मात्र तिच्या चेहऱ्यावरची चमक, तेज यावरुन ती कपूर आहे हे लगेच कळून यायचं. तिची कॉलेजमधील एन्ट्रींच जबरदस्त असायची. लांब लचक गाडीतून ती उतरायची. त्यानंतर लोक पार थांबून तिच्याकडे बघायचे. त्यावेळी तिच्याशी कधी बोलता आलं नाही. पण नंतर एक दोन-वेळा पार्ट्यांमध्ये भेटली त्यावेळी तिच्याशी बोललो होतो, असंही अवधूतने सांगितलं. (Latest Entertainment News)

अवधूत गुप्ते कोणत्या पक्षाला सपोर्ट करतो

'खुपते तिथे गुपते' अनेक दिग्गजांना बोलतं करणाऱ्या अवधूतने या मुलाखतीत अनेक प्रश्नाची उत्तर देत त्याच्या फन्सना आणखी जवळ केलंय. अवधूतची कमाई कुठून होते, त्याचा आवडता पक्ष कोणता, 'मोरया'चा पार्ट २ येणार का? अशा अनेक प्रश्नांची अवधूतने मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT