Avatar: The Way of Water Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Avatar: The Way Of Water'चा जगभरात डंका, लवकरच पार करणार २ अब्जांचा टप्पा...

Chetan Bodke

Avatar: The Way Of Water: 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या हॉलिवूड चित्रपटाने भारतात सर्वाधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर अवतारने अनेक जुन्या हॉलिवूड चित्रपटांचा रेकॉर्ड मोडित काढत आपलं स्थान कमवलं आहे. जेम्स कॅमरुन दिग्दर्शित चित्रपटाने अॅव्हेंजर्स एंडगेमलाही मागे टाकत बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला आहे. आत्तापर्यंत 'अवतार: द वे ऑफ वॉटर'ने ३६८.२० कोटी इतकी कमाई केली आहे.

अॅव्हेंजर्स एंडगेमने बॉक्स ऑफिसवर ३६७ कोटींचा गल्ला जमावला होता. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी अवतारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती देत सांगितले की, ' 'अवतार: द वे ऑफ वॉटर'ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. अॅव्हेंजर्स एंडगेमच्या कमाईला मागे टाकत आता नवा अवतारने नवा विक्रम रचला आहे.'

अवतार २ ने पहिल्या आठवड्यात १८२. ९० कोटी, दुसऱ्या आठवड्यात ९८. ४९ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ५४.५३ कोटी तर चौथ्या आठवड्यात २१. ५३ कोटींची कमाई केली. तर आता जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात ९. ४५ कोटी आणि सहाव्या आठवड्यात १.३० कोटींची कमाई केली. भारतात अवतार २ ने तब्बल ३६८. २० कोटींचा व्यवसाय केला आहे.

जगभरातील अवतार २ची कमाई पहाता चित्रपटाने १ अब्ज टप्पा पार केला असून आता चित्रपटातील चाहत्यांना २ अब्जची नक्कीच कमाई करेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कॅट विल्सन, सॅम वर्थिंग्टन, झो सलडाना, सिगॉर्नी वीव्हर आणि स्टिफन लँग आहेत. अवतारने जागतिक स्तरावर $1.93 बिलियनची कमाई केली आहे. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पायडर-मॅनने $1.92 बिलियनची कमाई केली होती. डिस्नेने या आठवड्याच्या सुरुवातीला ही माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT