Athiya- K.L.Rahul Wedding: तयारी झाली, मांडव सजला, कपड्यांपासून जेवणापर्यंत असा असणार थाट...

लग्नात आपली आवडती जोडी कोणते कपडे परिधान करणार, दोघांचा ही साज कसा असणार आणि ई. अशा प्रश्नांची उत्तरं अखेर आज चाहत्यांना मिळणार आहेत.
Athira Shetty and KL Rahul Image
Athira Shetty and KL Rahul ImageSaam Tv

Athiya- K.L.Rahul Wedding: आज भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू के. एल. राहूल आणि सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टी आज लग्नबंधनात अडकणार आहे. यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. २१ तारखेपासून मोठ्या धुमधडाक्यात लग्नाची जय्यत सुरुवात झाली असून २३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. सुनिलच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर ही लगीन गाठ बांधणार आहे. लग्नात आपली आवडती जोडी कोणते कपडे परिधान करणार, दोघांचा ही साज कसा असणार आणि ई. अशा प्रश्नांची उत्तरं अखेर आज चाहत्यांना मिळणार आहेत.

Athira Shetty and KL Rahul Image
Athiya- K.L.Rahul Wedding: राहुल-आथिया लग्नात माध्यमांसोबत साधणार संवाद, सुनील शेट्टींनी दिली महत्वाची महिती...

फक्त लग्नच नाही तर लग्नाशी संबंधित प्रत्येक विधी खूप खास असणार आहे. अथिया शेट्टी आणि के.एल.राहुलच्या लग्नात दाक्षिणात्य भारतातीय पद्धतीतील जेवणाचा बेत असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नातील पाहुण्यांना ताटात नाही तर पारंपारिक दक्षिण भारतीय शैलीत केळीच्या पानांवर जेवण दिले जाईल.

Athira Shetty and KL Rahul Image
Pathan Controversy : पठान चित्रपटाचं भलंमोठं पोस्टर उतरवलं; पुण्यात बजरंग दल आक्रमक

सोबतच दोघांच्याही कपड्यांबद्दल सांगायचे तर, रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि के.एल.राहुलने लग्नासाठी लाल नव्हे तर पांढरा आणि सोनेरी रंगाचा वेडिंग ड्रेस फायनल केला आहे. दोघेही सब्यसाची या ब्रँडचे कपडे परिधान करणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com