Avatar: The Way of Water Box Office Collection  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Avatar 2: 'अवतार 2'ची नव्या वर्षात रेकॉर्डब्रेक कमाई...

'अवतार: द वे ऑफ वॉटर' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Avatar: The Way of Water Box Office Collection: जेम्स कॅमेरॉन याचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच चांगली कमाई केली होती. जागतिक स्तरावर देखील या चित्रपटाने २०२२साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

'अवतार: द वे ऑफ वॉटर' प्रदर्शित होऊन १७ दिवस झाले आहेत. जगभरातील चित्रपटाच्या तिकिटांची विक्री १ बिलियन डॉलर इतकी झाली आहे. तसेच हा सर्वात जलद १ बिलियन कमाई करणार चित्रपट ठरला आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटरचे रोजचे कलेक्शन १० करोडापेक्षा जास्त झाले आहे. (Movie)

जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार 2' ने नवीन वर्षाच्या वीकेंडला सुद्धा अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. वर्षाच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला सुट्टीचा फायदा झाला आहे. या चित्रपटाची ३१ डिसेंबरला जितकी कमाई झाली त्यापेक्षा जास्त कमाई १ जानेवारी २०२३ झाली आहे. १ जानेवारी रोजी 'अवतार 2'चे एकूण कलेक्शन 17.25 कोटी होते. आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३३३ करोड इतके झाले आहे.

हा चित्रपट ज्या वेगाने कमाई करत आहे, त्यानुसार तो लवकरच अँथनी रुसोच्या 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ला मागे टाकणार यात दुमत नाही. 'एव्हेंजर्स एंडगेम'चे भारतातील एकूण कलेक्शन 367 कोटींपर्यंत होते. हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला होता. 16 डिसेंबर रोजी हिंदी आणि इंग्रजी भाषांसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT