Navardev Bsc Agri Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navardev Bsc Agri: प्रेक्षकांच्या मनात बसला ‘नवरदेव Bsc Agri.’; चित्रपटाला उदंड प्रतिसाद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Navardev Bsc Agri Marathi Movie :

शेतीवर प्रेम करणाऱ्या आणि अन्नदात्याचा मनापासून सन्मान करणाऱ्या प्रत्येकासाठी असा ‘नवरदेव Bsc Agri.’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी असलेले आणि शेतीचा काहीही संबंध नसलेले असे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक हा चित्रपट आनंदाने बघायला जात आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील चित्रपटगृहात प्रेक्षक गर्दी करत आहेत.(Latest News)

शेती करत असलेल्या Bsc Agri मुलाला लग्न जमविण्यासाठी काय उठाठेव करावी लागते, याची साधी, सरळ, सोपी गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आलीय. लेखक-दिग्दर्शक राम खाटमोडे आणि सहलेखक विनोद वणवे यांनी शेतकऱ्याच्या भावना अगदी योग्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडल्या आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी लिहिलेल्या संवादांचंही विशेष कौतुक होतंय. या चित्रपटातील गाणी, सिनेमेटोग्राफी, पार्श्वसंगीत, कलाकारांची उत्तम कामं आणि तरल दिग्दर्शन या सगळ्याच पातळ्यांवर हा चित्रपट सुंदर पद्धतीत साकारला गेलाय.

अभिनेता क्षितीश दाते आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या ग्रामीण भूमिकांचं कौतुक होतंय, तर मकरंद अनासपुरे यांनी साकारलेला वडिलांच्या भूमिकेतील सच्चा शेतकरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. क्षितीश, प्रियदर्शिनी यांच्यासोबतच प्रविण तरडेंचा तडका, मकरंद अनासपुरेंचा हशा, गार्गी फुलेंची प्रेमळ आई, रमेश परदेशींसारखा रांगडा भाऊ, हार्दिक जोशींसारखा तगडा पोलीस, नेहा शितोळेंनी साकारलेली मायाळू वहिनी, संदीप पाठकांची खास भूमिका, तानाजी गळगुंडे आणि विनोद वणवेंनी साकारलेले हवेहवेसे मित्र या सर्वच भूमिका चित्रपटात भाव खाऊन जातात.

चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील गाणी. या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलय कुणाल-करण यांनी. या चित्रपटातील गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. त्यापैकी रॉकसन या रॅपरने गायलेल्या ‘लाल चिखल’ या गाण्याला तरूणाईची विशेष पसंती मिळाली. यात शेतकऱ्याच्या वेदना परखडपणे मांडण्यात आल्या आहेत.

तर, शेतकरी गौरव गीताच्या रूपात ‘लढं रे तू बळीराजा’ हे दिव्य कुमारने गायलेलं गाणंही प्रेक्षकांना आवडतंय. याचबरोबर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे यांच्या ‘भेटणार कधी नवरदेवा नवरी’ या गाण्याच्या धूनने प्रेक्षकांना भूरळ घातलीय. तर मनिष राजगीरे यांनी गायलेलं ‘नवरदेव आला’ हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT