Akshara Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshara Singh: अक्षरा सिंहच्या कार्यक्रमात चाहत्यांनी केला राडा, दगडफेकीत पोलिसांसह 3 जण जखमी

Akshara Singh Attacked By Fan: अभिनेत्रीला कार्यक्रमाला पोहचण्यासाठी उशिर झाल्यामुळे तिचे चाहते संतप्त झाले. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या जमावाने दगडफेक केली. यामध्ये एका पोलिसासह तीन जण जखमी झाले आहेत.

Priya More

Bhojpuri Actress Akshara Singh:

'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) फेम आणि भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगबाबत (Akshara Singh) एक मोठी बातमी समोर येत आहे. अक्षरा सिंहच्या कार्यक्रमामध्ये दगडफेक करण्यात आली आहे. अभिनेत्रीला कार्यक्रमाला पोहचण्यासाठी उशिर झाल्यामुळे तिचे चाहते संतप्त झाले. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या जमावाने दगडफेक केली. यामध्ये एका पोलिसासह तीन जण जखमी झाले आहेत. अक्षरा सिंहला पोलिसांनी तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले. अभिनेत्री व्यवस्थित असून तिला काही झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षरा सिंहला औरंगाबाद दौडनगरच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र अक्षरा सिंह या कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहोचली. त्यामुळे अक्षरा सिंहचे चाहते संतापले आणि त्यांनी उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. या कार्यक्रमात संतप्त चाहत्यांनी दगडफेक देखील केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत अक्षरा सिंहच्या चाहत्यांना शांत केले.

अक्षरा सिंगला औरंगाबादच्या दाऊदनगरमध्ये एका शोरूमच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र धुक्यामुळे अभिनेत्रीच्या फ्लाइटला उशीर झाला आणि अक्षरा सिंह दुपारच्या ऐवजी संध्याकाळी दाऊदनगरला पोहोचली. अभिनेत्रीला उशिर झाल्याची सर्वजण तक्रार करत होते. अक्षरा येणार असल्यामुळे घटनास्थळी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अक्षरा कार्यक्रमस्थळी पोहचताच सेल्फी घेण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी करत तिला घेरलं. यावेळी पोलिसांना नागरिकांना नियंत्रित करणं कठीण झाले होते. या गर्दीत धक्काबुक्की झाल्यामुळे काही जणांना दुखापत झाली.

दुखापतीनंतर लोकांनी संतप्त होऊन अक्षरा सिंहवर राग व्यक्त केला. त्यांनी संतप्त होत कार्यक्रम स्थळी दगडफेक करण्यास सुरूवात केली. अनियंत्रित जमाव पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी अक्षरा सिंगला झाकून सुरक्षित स्थळी नेले. मात्र या सगळ्या घटनेमध्ये एका पोलिसासह तीन जण जखमी झाले. या घटनेनंतर अक्षरा सिंह दौडनगरमधून सुखरूप निघून गेली असून तिला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT