Raju Rahikwar Jr. Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raju Rahikvr: दोन भावांच्या भांडणात मध्यस्थी करणं पडलं महागात; ज्यु.शाहरुख खानवर जीवघेणा हल्ला

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये ज्युनिअर कलाकार म्हणून काम करणाऱ्या शाहरुख खानवर हल्ला झाला आहे.

Chetan Bodke

संजय गडदे

Raju Rahikvr News: मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये ज्युनिअर कलाकार म्हणून काम करणाऱ्या शाहरुख खानवर हल्ला झाला आहे. गोरेगाव फिल्मसिटीमध्ये असणाऱ्या बॉलिवूड पार्कमध्ये मागील अनेक वर्षांपासून पर्यटकांचे मनोरंजन करण्याचे काम ज्युनियर शाहरुख खान उर्फ राजू राहिकवर करत आहे.

बॉलिवूड पार्कचे व्यवस्थापन पाहणाऱ्या दोन भावांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या शाहरुख खान वर रॉडने हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात राजू राहिकवर जखमी झाले आहेत. यानंतर राजू रहिकवार उर्फ शाहरुख खान याने रोड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक ज्युनियर कलाकार हे बॉलीवूड पार्कमध्ये काम करत आहेत. या ठिकाणी काम करून मिळणाऱ्या पैशावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र या ठिकाणी बॉलिवूड पार्कचे व्यवस्थापन पाहणारे जय मिजगर आणि संतोष मिजकर त्यांच्यामुळे या जुनियर कलाकारांना काम करणे अवघड झाले होते, म्हणून अनेक ज्युनिअर कलाकारांनी या दोघांसोबत चर्चा करून व्यवस्थापनामध्ये असलेला वाद मिटवण्याची विनंती केली. यासाठी व्यवस्थापन पाहणारे जय मिजकर आणि संतोष मिजगर यांच्यासोबत राजू रहिकवार यांची बैठक सुरू झाली.

मात्र बैठक सुरू असतानाच जय मिजकर आणि संतोष मिजगर यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद मिटवण्यासाठी राजू रहीकवार शाहरुख खान यांनी पुढाकार घेतला मात्र जय मिजगर याने राजू रहीकवार उर्फ शाहरुख खान याच्यावर हल्ला केला.यावेळी जय मिजकर याने त्यास शिवीगाळ देखील केली.यानंतर समोरील टेबल उचलून रॉडने पाठीवर जोरदार हल्ला केली यात राजु रहिकावर हे बेशुद्ध झाले.शुद्दीवर आल्यानंतर राजू रहिकावर उर्फ शाहरुख खान याने जय मिजगर विरोधात आरे रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT