Athiya- Rahul Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Athiya- K.L.Rahul Wedding: गळ्यात माळ अन् पायात कोल्हापूरी, सुनिलच्या साऊथ इंडियन लूकची मंडपात हवा...

वर- वधूच्या कपड्यांच्या चर्चेप्रमाणे बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीच्या कपड्यांचीही चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

Chetan Bodke

Athiya- K.L.Rahul Wedding: काल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल काल संध्याकाळी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. सुनिल शेट्टीचे खंडाळ्यात एक भव्य दिव्य असे फार्महाऊस आहे, त्याच ठिकाणी त्यांनी लग्नाचे सात फेरे घेतले. बॉलिवूड आणि अनेक क्रिकेट खेळाडूंनी लग्नगाठ बांधत एकमेकांना सात जन्माचे वचन दिले. सर्वांच्या लूक प्रमाणे अथियाच्या वडिलांची अर्थात बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीच्या कपड्यांचीही चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

सध्या सोशल मीडियावर अथियाचा भाऊ अहान शेट्टी आणि वडील सुनिल शेट्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही मोजक्याच पाहुण्यांमध्ये त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी लग्नसोहळ्याला मोजक्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. विवाहसोहळा संपन्न होताच सुनील शेट्टीने आपल्या मुलासोबतच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिठाई वाटली. त्यावेळी सुनीलच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी सुनीलने आपल्या लेकीच्या लग्नात लुंगी, कुर्त्यासोबतच गळ्यात माळ आणि कोल्हापूरी चप्पल घातली होती. यावेळी सुनीलच्याही कपड्यांची चर्चा होत होती. त्यासोबतच अथियाचा भाऊ अहानने बहिणीच्या लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता आणि जॅकेट परिधान केलं होतं. यावेळी सर्वांच्याच कपड्यांची चर्चा होत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: महिलांसाठी महेश्वरी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, या 5 डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील

मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीच्या सरपंचासह ५ सदस्यांचे पद रद्द; अतिरिक्त विभागीय आयुक्तांचे आदेश

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

SCROLL FOR NEXT