Athiya Shetty and KL Rahul Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

अथिया शेट्टीने केएल राहुलवर केला प्रेमवर्षाव; बॉयफ्रेंडच्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो केला शेअर

अथिया शेट्टी अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू के.एल. राहुलला डेट करत आहे. हे जोडपे सध्या जर्मनीत आहे. शस्त्रक्रियेनंतर अथियाने तिच्या इंस्टाग्रामवरून के.एल. राहुलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा अॅक्शन हिरो सुनील शेट्टी याची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने(AthiyaShetty) तिचा बॉयफ्रेंड भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुलच्या(KL Rahul) शस्त्रक्रियेनंतर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी राहुलला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर तो शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला गेला होता. जिथे आता त्याच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली आहे. के. एल. राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर अथिया खूप आनंदी आहे.

अथियाने तिच्‍या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर राहुलचा फोटो शेअर केला आहे. जो के. एल. राहुलने काही तासांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. अथियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर के.एल. राहुलचा फोटो हसणाऱ्या इमोजीसह शेअर केला आहे. के.एल. राहुलचा हा फोटो शस्त्रक्रियेनंतरचा आहे. फोटोमध्ये के.एल. राहुल बेडवर बसून हसताना दिसत आहे.

के.एल. राहुलने त्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल माहिती देत पोस्टद्वारे त्याने आपल्या चाहत्यांचे, कुटुंबीयांचे आणि मित्रांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, 'गेले काही आठवडे माझ्यासाठी कठीण होते पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी हळूहळू बरा होत आहे. माझी रिकव्हरीही सुरू झाली आहे. आपण लवकरच भेटू..'

के.एल. राहुलवर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. माहितीनुसार, राहुल एक महिना जर्मनीत राहणार आहे आणि अथिया शेट्टीही त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्यासोबत तिथेच जर्मनीत राहणार आहे.

अथिया आणि के.एल. राहुल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण या कपलने अद्याप त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, दोघेही यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. याविषयी दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी, अथियाचे वडील सुनील शेट्टीने त्यांच्या नात्याला मान्यता दिली आहे, असे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT