Ashutosh gokhle Saam TV
मनोरंजन बातम्या

Ashutosh Gokhale : खलनायक हूं मैं...अभिनेता आशुतोष गोखले झळकणार खलनायकाच्या भूमिकेत

Ashutosh Gokhale : 'तुला पाहते रे' आणि 'रंग माझा वेगळा' अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणारा अभिनेता आशुतोष गोखले लवकरच खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ashutosh Gokhale : स्टार प्रवाहच्या रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिक इनामदार अर्थात अभिनेता आशुतोष गोखले लवकरच तू ही रे माझा मितवा या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने आशुतोष पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. राकेश भोसले असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय विक्षिप्त स्वभावाचं हे पात्र आहे.

रंग माझा वेगळा मालिकेत आशुतोष गोखलेने साकारलेल्या कार्तिक इनामदार या पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेत आदर्श पती, आदर्श मुलगा आणि आदर्श बाबा अशी भूमिका साकारल्यानंतर आशुतोषने नवा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठीच त्याने ही आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे.

या नव्या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, ‘याआधी बऱ्याचदा मला खलनायक साकारण्यासाठी विचारणा झालीय. तू ही रे माझा मितवा मालिकेतून मी पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. खरतर थोडं दडपण आहे. रंग माझा वेगळामध्ये सकारात्मक भूमिका मी साकारली मात्र मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात कार्तिक हे पात्र खलनायकी झालं होतं. त्यामुळे अभिनयाचे वेगवेगळे रंग प्रेक्षकांनी याआधीही अनुभवले आहेत. राकेश या पात्राला कसा प्रतिसाद मिळतोय याची प्रचंड उत्सुकता आहे.

तू ही रे माझा मितवा या मालिकेत आशुतोषसोबत अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर मुख्य भूमिकेत आहेत. 'तू ही रे माझा मितवा' ह मालिका 'इस प्यार को क्या नाम दूँ' या स्टार प्लसवरील हिंदी मालिकेचा रीमेक आहे. त्या मालिकेत श्याम नावाचे पात्र खलनायक होतं. आशुतोषही तीच भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगात आहेत. तेव्हा नक्की पहा तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT