Tujhi Majhi Jodi Jamli Remake Saam TV
मनोरंजन बातम्या

Tujhi Majhi Jodi Jamli Remake: ३५ वर्षांनी रिक्रिएट झाले अशोक सराफ-किशोरी शहाणेंचं 'तुझी माझी जोडी जमली' गाणं

Ashok Saraf-Kishori Shahane Song: माझा पती करोडपती या चित्रपटातील तुझी माझी जोडी जमली' या गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे.

Pooja Dange

Hemant Dhome-Anuja Sathe Recreate Tujhi Majhi Jodi Jamli: 'माझा पती करोडपती' या चित्रपटातील 'तुझी माझी जोडी जमली' हे एक एव्हरग्रीन गाणं आहे. 'अगं हेमा'..., म्हटलं की या गाण्याची पुढची ओळ आपसूकच आपल्या तोंडावर येते. हे गाणं अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्यावर चित्रित झालं होत. २० जानेवारी, १९८८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३५ वर्ष झाली आहेत.

आज या चित्रपटाची आणि या गाण्याची आठवण येण्यामागचं कारणही तसंच आहे. माझा पती करोडपती या चित्रपटातील तुझी माझी जोडी जमली' या गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे. रिमेक झालेले हे गाणे हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. (Entertainment News)

श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील सगळे कलाकार समोर आल्यानंतर या चित्रपटातील एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यातील रिमेक केलेले 'तुझी माझी जोडी' हे गाणे हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायले असून शांताराम नांदगावकर आणि हर्ष, करण, आदित्य या 'ट्रिनिटी ब्रदर्स' यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. या गाण्याला 'ट्रिनिटी ब्रदर्स'चेच संगीत लाभले आहे.

हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे ऐंशीच्या दशकात नेणारे आहे. उडत्या चालीचे हे गाणे ऐंशीच्या काळातील सुपरहिट गाणे असून ते रिक्रिएट करण्यात आले आहे. हे रेट्रो लूकमधील गाणे पाहाताना आणि ऐकताना संगीतप्रेमींना त्याच काळात गेल्याचा अनुभव येईल.

या गाण्याबद्दल ट्रिनिटी ब्रदर्स म्हणतात, "अनेक जुनी गाणी पुनर्रचित (रिमेक) करून, ती नव्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे सध्या फॅड आहे. आम्हीही या गाण्यातून असाच प्रयत्न केला आहे. परंतु यात आम्ही या गाण्याला नवीन स्वरूपात न आणता अगदी जसेच्या तसे समोर आणले आहे, अगदी कलाकारांचे नृत्य, पेहरावही तसेच आहे. अर्थात काही छोटे बदल आहेत, जे प्रेक्षकांना दिसतीलच. रेट्रो फील देण्याचा आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.''

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, अनुजा साठे, रसिका सुनील, कबीर दुहान सिंग, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा असलेला हा चित्रपट येत्या १९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT