Ashok Mama SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Mama: 'अशोक मा.मा.' मालिकेत वर्षा उसगांवकर यांची धमाकेदार एन्ट्री; रंगणार मंगळागौरीचा महाखेळ, पाहा VIDEO

Mangalagaur Special Episode : 'अशोक मा.मा.' मालिकेत दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची एन्ट्री होणार आहे. त्या मंगळागौरीच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहेत.

Shreya Maskar

'अशोक मा. मा.' (Ashok Mama) मालिकेत सध्या धमाल-मज्जा मस्ती पाहायला मिळत आहे. अशोक मामा आपल्या सुनेची म्हणजेच भैरवीची पहिली मंगळागौर साजरा करण्याचा घाट घालणार आहेत. नुकतेच अनिश आणि भैरवीचं लग्न झाले आहे. त्यामुळे भैरवीची पहिली मंगळागौर मोठ्या उत्साहात अशोक मामा साजरी करणार आहेत. त्या निमित्ताने मंगळागौरीच्या विशेष भाग (Mangalagaur Special Episode) पाहायला मिळणार आहे. यात भैरवीच्या सुहासिनी मैत्रिणी इंदू, वल्लरी, प्रेरणा मंगळागौरसाठी उपस्थित राहणार आहेत.

मंगळागौरीचा हा खास सण साजरा करण्यासाठी 'अशोक मा. मा.' या मालिकेत मराठमोळी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांची धमाकेदार एन्ट्री होणारआहे. अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर हे दोघं मोठे कलाकार एकाच पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. मालिकेत वर्षा उसगांवकर या मंगळागौर सादर करणाऱ्या महिला ग्रुपच्या अध्यक्ष आहेत आणि मामांच्या मैत्रीण देखील.

मंगळागौरच्या खास भागात भैरवीसह तिच्या मैत्रीणी आणि वर्षा ताई खास पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळणार आहेत. नऊवारी साडी, केसात गजरा, सुंदर दागिने आणि साज शृंगार करून अभिनेत्री दिसणार आहेत. मालिकेत पारंपरिक खेळ, नृत्य पाहायला मिळणार आहे. जल्लोषात भरलेला हा भाग असणार आहे. 'मंगळागौर' विशेष भागात वर्षा उसगांवकर यांचा खास डान्स देखील असणार आहे.

वर्षा उसगांवकर यांच्या एन्ट्रीने 'अशोक मा. मा.' मालिकेच्या कथानकाला एक खास वळण येणार आहे. 'अशोक मा. मा.' मालिकेचा खास मंगळागौर विशेष भाग 3 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil Photos: रुपाची राणी! गौतमी पाटील झाली राधा, आरस्पानी सौंदर्य

Terrace Farming : सेंद्रिय पद्धतीने टेरेसवर फुलविली शेती; तळेगावातील उच्चशिक्षित महिलेचा प्रयोग

Horoscope Tuesday : अंगारकी चतुर्थीला ४ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे भविष्य

Herbal Tea : सकाळी उठल्यावर प्या 'ही' हर्बल टी, पोटाच्या समस्यांपासून होईल सुटका

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये एकाच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद

SCROLL FOR NEXT