Aryan Khan Clothing Brand Has high price Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan's Luxury Brand Launch: किंग खानच्या युवराजचे राजेशाही थाट; आर्यन खानच्या कपड्यांची किंमत ऐकून थक्क व्हाल

Aryan Khan Brand Website get Crash: आर्यन खानच्या ब्रँडच्या कपड्यांच्या किंमती पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Pooja Dange

Aryan Khan Clothing Brand Price: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा लग्झरी क्लोदिंग ब्रँड D'YAVOL X गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आर्यन खानने स्वतः या जाहिरातीचे दिग्दर्शन केले होते. हे आर्यन खानचे पहिले प्रोजेक्ट होते आणि पहिल्याच प्रोजेक्टमध्ये त्याने शाहरुख खानला कास्ट केले होते, ज्यामुळे तो चर्चेत होता.

शाहरुख खानने त्याच्या या जाहिरातीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. अनेक सेलिब्रिटी आर्यनला शुभेच्छा देत आहेत आणि त्याचे अभिनंदन करत आहेत. या ब्रँडची वेबसाइट रविवारी लाईव्ह झाली आहे, ज्यामध्ये या ब्रँडच्या कपड्यांच्या किंमती पाहून चाहते हैराण झाले आहेत. इतकेच नाही तर सोशल मीडियावर यावरील फनी मीम्सही सातत्याने व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

आर्यन खानच्या कपड्यांच्या ब्रँड D'YAVOL X ची वेबसाईट लाइव्ह असताना क्रॅश झाली, ब्रँडने ट्विट करून सांगितले, "आम्ही खूप जास्त ट्रॅफिक आणि चेकआउट एक्सपपिरियन्स करत आहोत. त्यामुळे कृपया आमच्या सोबतचा राहा." यानंतर, त्याने वेबसाइट पुन्हा लाइव्ह झाल्याची घोषणा केली, त्यानंतर चाहत्यांनी खरेदी सुरू केली. (Latest Entertainment News)

कपड्यांची किंमत पाहून काही चाहत्यांनी ट्विटरवर आपापली प्रतिक्रियाही शेअर केली आहे. कपड्यांच्या किंमतींचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर करताच मीम्स पाऊस पडू लागला. प्रतिक्रिया देताना अनेकांनी मजेशीर मीम्सच्या माध्यमातून त्यांच्या मनातील कहाणी सांगितली आहे.

तसेच आर्यन खानने वडिलांसोबत सेटवर काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. हार्पर बाजारला दिलेल्या मुलाखतीत आर्यन खान म्हणाला, "माझ्या वडिलांसोबत काम करणे माझ्यासाठी कधीच आव्हानात्मक नव्हते.

कारण त्यांच्या अनुभवाने आणि समर्पणाने ते सेटवर प्रत्येकाचे काम सोपे करतात. ते सर्व क्रूला कंम्फटेबल करतात आणि सर्वांचा आदर करतात. जेव्हा ते सेटवर असतात तेव्हा मी नेहमी जास्त अलर्ट असतो. त्यांच्याकडून काहीही नवीन शिकणे मी चुकवत नाही.

आर्यन खानने कार्टून फिल्म्समध्ये त्याचा आवाज दिला आहे. लवकरच तो एका वेब सीरिजचे दिग्दर्शन करतानाही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips : मेकअपनंतर चेहरा काळा पडला? आजपासून टाळा 'या' ५ चुका

Tulsi Vivah: दिवाळीनंतर तुळशीचं लग्न कोणासोबत लावतात? कोण आहे तुळशीचा नवरा

Kalyan : 'एकच प्याला' पडला महागात; दारुच्या दुकानातील एक्सपायरी डेट संपलेली बिअर प्यायल्याने ग्राहकाची प्रकृती बिघडली

Batatyache Kaap: कुरकुरीत अन् चटपटीत बटाट्याचे काप, जेवणासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन

Maharashtra Cabinet Meeting Controversy: शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्रिमंडळात खडाजंगी|VIDEO

SCROLL FOR NEXT