Arshad Warsi Confirms Jolly LLB 3 With Akshay Kumar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jolly LLB 3: Jolly LLB चा सिक्वेल येणार ! अक्षय- अर्शदची कॉमेडी प्रेक्षकांना पुन्हा खळखळून हसवणार

Jolly LLB 3 Announcement: ‘असूर २’ या वेबसीरिजमुळे चर्चेत राहिलेला अर्शद वारसी लवकरच जॉली एलएलबीच्या सिक्वेलमध्यो तो दिसणार आहे.

Chetan Bodke

Arshad Warsi Confirms Jolly LLB 3 With Akshay Kumar: अर्शद वारसी सध्या ‘असूर २’ या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत आहे, या वेबसीरिजमधील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंदीस पडत आहे. अशातच अर्शद वारसीने आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. जॉली एलएलबीमध्ये अर्शद वारसीने उत्तम अभिनय केला आहे. ज्या चित्रपटाने त्याला सर्वाधिक प्रसिद्धी दिली, त्याचा लवकरच सिक्वेल येणार आहे. अर्थात जॉली एलएलबीचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जॉली एलएलबीच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे. अलीकडेच एका मुलाखतीत अर्शद वारसीने या चित्रपटासंबंधित माहिती दिली. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम सुरू असल्याचे अभिनेत्याने सांगितले. मुख्य बाब म्हणजे तो सुद्धा, चित्रपटात प्रमुख भूमिका साकरणार असल्याची माहिती दिली. ‘असूर २’ या वेबसीरिजममध्ये अर्शदने धनंजय राजपुत नावाच्या एका अधिकाऱ्याची भूमिका साकरली. त्याची ही बहुचर्चित वेबसीरिज सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

आता असूर २ नंतर पुन्हा एकदा अर्शद जॉली एलएलबी ३ मुळे चर्चेत आला आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सध्या मिळाली आहे. जॉली एलएलबीमध्ये अक्षय कुमार, सौरभ शुक्ला आणि अर्शद वारसी सारखे सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसले. अर्शदने चित्रपटात वकिलाची भूमिका साकारली होती. त्यातील त्याचे डायलॉग्स आणि बोलण्याची शैली प्रेक्षकांसमोर एक वेगळाच भाव खाऊन गेला. आता पुन्हा एकदा चित्रपटात अर्शदसोबत अक्षय कुमार देखील झळकणार आहे. लवकरच चित्रपटाची शूटिंग होणार असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

अर्शद वारसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘मुन्नाभाई ३’ मध्ये दिसण्याची शक्यता असून अद्याप चित्रपटाबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. सोबतच तो ‘गोलमाल ५’ साठी देखील उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

PM Ujjawala Yojana: पीएम उज्जवला योजनेत मिळतात मोफत गॅस सिलेंडर; आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया घ्या जाणून

Malaika Arora : मलायका अरोरा झाली मालामाल; विकलं मुंबईतील आलिशान अपार्टमेंट, नफा वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT