A. R. Rahman SAAM TV
मनोरंजन बातम्या

A. R. Rahman : 'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्याला ए.आर. रेहमान यांचा मराठमोळा अंदाज, गायिका वैशाली सामंतसोबत गायलं गाणं

A.R.Rahman-Vaishali Samant Performance : नुकताच पार पडलेल्या 'छावा' चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्याला गायक ए.आर. रेहमान यांनी उपस्थिती लावली आणि आपल्या सुरेल आवाजाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Shreya Maskar

'छावा' (chhaava) चित्रपट आता काही तासांत रिलीज होणार आहे. चाहेत चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले आहे. चित्रपटाचे तगडे प्रमोशन करण्यात आले आहे. 'छावा' चित्रपट उद्या (14 फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून संभाजी महाराजांची यशोगाथा दाखवण्यात आली आहे. नुकताच 'छावा'चा म्युझिक लाँच सोहळा पार पडला.

'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्याला खूप मोठे कलाकार पाहायला मिळाले. यात गायक आणि संगीतकार ए.आर. रेहमान (A. R. Rahman) यांनी देखील हजेरी लावली. तसेच आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 'छावा' चित्रपटाची गाणी खूप गाजत आहे. चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'छावा' चित्रपटात 'जाने तू', 'आया रे तुफान' ही गाणी आहेत.

ए. आर. रहमान आणि मराठी गायिका वैशाली सामंतने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. ए. आर. रहमान आणि वैशाली सामंतने (Vaishali Samant ) 'छावा' चित्रपटातील 'आया रे तुफान' हे गाणे गायले आहे. यांच्या गाण्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. गायिका वैशाली सामंतने देखील याचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. याला तिने हटके कॅप्शन दिलं आहे. वैशालीने लिहिलं की, "माझ्यासाठी खूप खास दिवस... 'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्याला ए. आर. रहमान सरांसोबत परफॉर्मन्स...माझं एक स्वप्न पूर्ण झालं..."

12 फेब्रुवारीला 'छावा' चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला आहे. 'छावा' चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये झाला. 'छावा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच तगडी कमाई केली आहे. 'छावा' पहिल्या दिवशी छप्परफाड कमाई करणार असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

SCROLL FOR NEXT