Abhinav Singh Death: संगीत विश्वावर शोककळा; रॅपरनं भाड्याच्या घरात संपवलं आयुष्य, पत्नी संशयाच्या भोवऱ्यात

Rapper Abhinav Singh : प्रसिद्ध रॅपर अभिनव सिंगने आत्महत्या केली आहे. यामुळे संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Rapper Abhinav Singh
Abhinav Singh DeathSAAM TV
Published On

ओडिशाचा प्रसिद्ध रॅपर अभिनव सिंहने (Abhinav Singh ) बेंगळुरूमध्ये आत्महत्या केली. या घटनेमुळे संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्याचे रॅपर खूप गाजत होते. त्याच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंब, मित्रपरिवाराला धक्का बसला आहे. एक चांगला रॅपर गमवला आहे. अभिनव सिंह 'जगरनॉट' नावाने लोकप्रिय होता. या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनव सिंहचा मृतदेह त्यांच्या बेंगळुरू येथील घरात सापडला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्राथमिकतपासातून रॅपरने विष पिऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे. सुसाईड नोट किंवा इतर कोणतेही गोष्टी समोर आल्या नाहीत. मात्र अभिनवच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पत्नीवर आरोप केले आहेत. अभिनवच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, "रॅपरने पत्नीसोबत झालेल्या वादातून हे पाऊल उचलले आहे." याप्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनव सिंह हा शहरातील एका खासगी कंपनीत काम करत होता. रॅपर अभिनव इंजिनिअर असून तो 32 वर्षांचा होता. सध्या पोलीस या प्रकरणात तपास घेत आहेत. अभिनव सिंहच्या मृतदेह अंत्यसंस्कार ओडिशात होणार आहे. अभिनवचा वडिलांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी तक्रारीत केला आहे. तसेच अभिनवचे वडील विजय नंदा सिंह यांनी तक्रारीत 8 ते 10 जणांची नावे नोंदवली असून योग्य तपासाची मागणी केली आहे.

अभिनव सिंहची कारकीर्द

अभिनव सिंहने ओडिशामध्ये मोठे नाव कमावले आहे. तो एक उत्तम रॅपर होता. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष करून आणि आपले करिअर बनवत होता. अभिनवचे 'कटॅक अँथम' हे गाणे खूप गाजले. तो तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय झालेला. कारण त्याचे रॅपर सत्य घटनांशी किंवा आयुष्यातील घडामोडींशी संबंधित होते. आज अभिनवच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Rapper Abhinav Singh
Vijay Deverakonda : 'VD12'चा टीझर तीन भाषांमध्ये प्रदर्शित, हिंदीत आवाज कुणाचा? विजय देवरकोंडा आभार मानत म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com